ऐकावं ते नवलंच...दोन भूतांनी शेतकऱ्याला दिली जीवे मारण्याची धमकी?

तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल, अशी एक नवलंच घटना गुजरात मधील पंचमहाल जिल्ह्यातील जांबुधोदा तहसीलच्या जोतवाड गावात घडलेली आहे.
ऐकावं ते नवलंच...दोन भूतांनी शेतकऱ्याला दिली जीवे मारण्याची धमकी?
ऐकावं ते नवलंच...दोन भूतांनी शेतकऱ्याला दिली जीवे मारण्याची धमकी?Saam Tv

मुंबई : तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल, अशी एक नवलंच घटना गुजरात Gujarat मधील पंचमहाल Panchmahal जिल्ह्यातील जांबुधोदा तहसीलच्या जोतवाड Jotwad गावात घडलेली आहे. या गावात राहणाऱ्या व्यक्तीने जांबुधोडा Jambudhoda पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे की, या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे, जेव्हा तो शेतात काम करत होता. त्यावेळी त्याठिकाणी २ भूतं आली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 2 Ghost threatened to kill the farmer

इतकेच नव्हे, तर ती भूतं मानसिकरित्या त्याला त्रासंही देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरसंगभाई बारिया यांच्या बोलण्यावरून जांबुधोडा पोलिसांनी Police तक्रार दाखल करून घेतली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास देखील सुरु केला आहे. मात्र, या तपासादरम्यान वरसंगभाई बारिया मानसिकरित्या आजारी असल्याचे समोर आले आहे. जांबुधोडा पोलिसांनी भूतांच्या Ghost माध्यमातून जीवे मारण्याची धमकी मिळाली.

हे देखील पहा-

त्यावेळेस पोलीस देखील हैराण झाले होते. यानंतर पोलिसांनी शेतात जाऊन तपासणीला सुरवात केली. शेतात काहीही हाती लागले नाही. वरसंगभाई यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर, तो मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे लक्षात आले आहे. वरसंगभाई यांच्या कुटुंबियांना त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्याचेही माहित नव्हतं. दरम्यान, वरसंगभाई यांची मानसिक परिस्थिती बर नसल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. 2 Ghost threatened to kill the farmer

ऐकावं ते नवलंच...दोन भूतांनी शेतकऱ्याला दिली जीवे मारण्याची धमकी?
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ होणार

जांबुधोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन येत असेल, तर त्यांची तक्रार नोंदवून घेणे हे आमचे काम आहे. आम्हाला पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड असल्याचे संशय होता. मात्र, आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियांशी चर्चा केली आहे.

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आम्ही मनोचिकित्सकांशी त्यांचा संपर्कही Contacts करून दिला आहे. भूत जीवे मारण्याची धमकी देऊन, गेल्याची तक्रार नोंदवणारे वरसंगभाई यांचे भाऊ महेश बारिया यांच्या मतानुसार, गेल्या काही वर्षापासून वरसंगभाई यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. या आजारासाठी त्यांची औषधंही- उपचार सुरु आहेत. मात्र, गेल्या १० दिवसांपासून त्यांनी औषधं घेतली नव्हती. 2 Ghost threatened to kill the farmer

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com