New Delhi Railway Station Stampede Update : शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १४ महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी (New Delhi Railway Station Stampede) उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आलेय.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यात दोन ट्रेन उशीरा आल्याने गर्दी आणखी वाढली. दिल्ली रेल्वे स्टेशनवर दर तासाला जनरलची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली गेली. ४०० जागांसाठी तब्बल १५०० तिकिटांची विक्री झाली, त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी अवाक्याबाहेर गेली. त्यातूनच चेंगराचेंगरी झाल्याचे समोर येतेय.
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १८ जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये १४ महिलांचा समावेश होता. चेंगराचेंगरीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर एलएनजेपी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १४ वर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. प्लॅटफॉर्मवर अचानक गर्दी वाढल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जातेय. महाकुंभात स्नान करण्यासाठी भाविक जात होते, त्याचवेळी ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलेय. त्याशिवाय या दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी दु:ख व्यक्त केलेय. पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 'नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. उपचार घेणारे लवकरात लवकर ठीक व्हावेत, अशी प्रार्थना करतो.'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले ?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील दुर्घटनेसंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसी चर्चा केली. दिल्लीचे उपराज्यपाल आणि पोलिस आयुक्त यांच्याशी याप्रकरणाची माहिती घेत त्यांना संभाव्य मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावलेल्यांच्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. जखमींना सर्व संभाव्य उपचार दिले जात आहेत, असे ट्वीट अमित शाह यांनी केलेय. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेविषयी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.