लग्नाचं आनंदी वातावरण क्षणात दुःखात बदललं; डीजेच्या आवाजाने १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Uttar pradesh news : डीजेच्या आवाजाने १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली.
Uttar pradesh shocking
Uttar pradeshSaam tv
Published On
Summary

मुजफ्फरनगरमधील एका लग्न समारंभात डीजेच्या अति आवाजामुळे मुलीचा मृत्यू झाला

१४ वर्षीय राशीला हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला

या घटनेने आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील अहरोडा गावात दुर्दैवी घटना घडली आहे. गावातील लग्नघरात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नातील वरातीमधील डीजेच्या आवाजाने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. इयत्ता नववीत असणाऱ्या मुलीच्या मृत्यूने कुटुंबासहित गावकऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

मुजफ्फरनगरमधील अहरोडा गावात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. गावातून जोनी वाल्मिकी यांच्या मुलीचा वरात निघाली होती. वरातीदरम्यान गावातील महिला, लहान मुले छतावरून वरात पाहत होते. या वरातीत डिजेसहित बँड बाजा, ढोलचा आवाज सुरू होता. त्याचा आवाज भरपूर होता.

Uttar pradesh shocking
U19 Asia Cup 2025 : नाद करायचा नाय! भारताने पाकिस्तानचा ९० धावांनी धुव्वा उवडला; दीपेश आणि कनिष्कची गोलंदाजी ठरली गेमचेंजर

१४ वर्षीय राशी देखील कुटुंबासोबत वरात पाहत होती. या डिजेच्या आवाजाने छताला देखील हादरे बसत होते. याच आवाजाने राशीला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे तिची प्रकृती बिघडली.

राशीची तब्येत बिघडल्यानंतर नातेवाईकांनी एकच आरडाओरड केली. नातेवाईकांनी तातडीने राशीला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या राशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राशीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Uttar pradesh shocking
19 Minute 34 Seconds Viral Video Link : 19 मिनिटांचा व्हायरल MMS VIDEO खरा की खोटा? महत्वाची माहिती आली समोर

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आमदार मदन भैया यांनी राशीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. राशीच्या मृत्यूने गावातील लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Uttar pradesh shocking
Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, 'डीजेचा अति आवाज आता लोकांचा बळी घेऊ लागला आहे. डिजेच्या अति आवाजामुळे वृद्ध, लहान मुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने कारवाई करावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com