हैदराबादमध्ये अग्नितांडव, भंगार गोदामातील ११ जणांचा मृत्यू

आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Hyderabad Fire News Updates
Hyderabad Fire News UpdatesTwitter/@ANI
Published On

हैदराबादच्या भोईगुडा येथे बुधवारी पहाटे लोखंड आणि प्लास्टिकच्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली. या अपघातात 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत अग्निशमन विभागाच्या (Fire Brigade) अधिकाऱ्यांनी 11 मृतदेह बाहेर काढले असून ते सर्व बिहारमधील स्थलांतरित मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Hyderabad Fire News Updates)

सिकंदरद रेल्वे स्थानकाजवळील निवासी वसाहतीमधील दाट लोकवस्तीच्या भोईगुडा भागातील IDH कॉलनी येथील गोडाऊनच्या वरच्या मजल्यावर सुमारे 13 कामगार झोपले असताना पहाटे 4 च्या सुमारास ही आग लागली अशी माहिती मुशीराबाद पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Hyderabad Fire News Updates
सलमानला अंधेरी न्यायालयाचं समन्स, ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

आगीने संपूर्ण गोडाऊनला जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने सकाळी ७ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com