

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो अडचणीत सापडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे नाव वेगवेगळ्या प्रकरणांशी जोडले जात आहे. आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आले असून, त्यामुळे सलमान खानला पुन्हा न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहे. एका पत्रकाराने चार वर्षांपूर्वी सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पत्रकाराला शिवीगाळ आणि नंतर धमकावण्यात आले होते असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या (Mumbai) अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने आता याच प्रकरणी सलमान खानला समन्स पाठवले आहे. समन्सनुसार, सलमान खान 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार आहे.(Mumbai court summons to Salman Khan)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पत्रकार अशोक पांडे यांनी २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरोधात तक्रार दाखल केली होती. अशोक पांडे आपल्या तक्रारीत म्हणाले की, २०१९ मध्ये ते कॅमेरामनसोबत कुठेतरी जात होते आणि वाटेत त्यांना सलमान खान सायकल चालवताना दिसला. अभिनेत्याच्या दोन्ही अंगरक्षकांची परवानगी घेतल्यानंतर अशोकने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. ही बाब सलमान खानला समजताच त्याने याला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर सलमान खानच्या अंगरक्षकानेही त्याच्यावर हात उचलला. इतकंच नाही तर सलमान खानने आपल्या मारहाण करून फोन हिसकावून घेतल्यानंतर धमकी दिल्याचंही अशोकने आपल्या तक्रारीत स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला नुकताच कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 23 वर्षे जुन्या या प्रकरणाबाबत सलमान खानची याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. आता कनिष्ठ न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयातच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.