पुण्याचा नरपत गिरी चौक... खांद्यावर बॅग, खिशात हात घालून आणि वर आकाशाकडे एकटक पाहणारा हा तरुण पाहा. हा तरुण काही विमान बघत उभा नाही, तर याला दिवसा तारे दिसतायेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण याच स्थितीत हा तरुण चक्क दोन तास एकाच जागी खिळला होता. हा तरुण झोंबी ड्रग्जच्या नशेत होता असा दावा आता केला जातोय. जिवंत माणसाचे पुतळे करणारं हे झोंबी ड्रग्ज किती भयानक आहे, त्याचा प्रत्यय पुण्यातल्या या घटनेनं आलाय. नेमकं काय आहे हे झोंबी ड्रग्ज ते पाहूयात...
जनावरांना भूल देण्यासाठी बनवलेलं झायलाझीन हे ड्रग्ज स्वस्त किंमतीत मिळतं... व्हेटर्नरी मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतं... हे ड्रग्ज फेन्टाईल या अतिशय घातक ड्रग्जसोबत घेतलं जातं... त्यामुळे त्याची नशा अनेक तास टिकते... आणि व्यक्ती कित्येक तास बेफानपणे एकाच जागी स्थिर राहते... एवढंच नाही तर या ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तरुणांचा मृत्यूही होण्याची शक्यता असते.
जनावरांसाठी बनवलेल्या या ड्रग्जनं अमेरिका, युरोप आणि रशियानंतर आता या जीवघेण्या नशेने थेट आपल्या भारतात शिरकाव केलाय. चंदीगडमध्ये डिलिव्हरी बॉय, बिहारमध्ये मोटारसायकलवरचा तरुण, मिरारोडचा एक युवक आणि आता पुण्यातील हा झिंगलेला तरुण पाहिल्यानंतर पुण्यातील तरुणाईवर मोठं संकट असल्याचं दिसतंय. कारण वैभवशाली पुण्यात 9-10 विद्यापीठं आणि 800 पेक्षा जास्त कॉलेज असून देशविदेशात लाखो विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात त्यामुळे हा धोका ओळखून आता पोलिसांनी तरुणाईला झिंगवणाऱ्या आणि झोंबी पुरवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.