ऑनलाइन मद्य मागविणे पडले तरुणीला महागात

मैत्रिणी Friends बरोबर दारू पार्टीसाठी ऑनलाइन मद्य मागविणे, तरुणीला चांगलच महागात पडले आहे. त्या तरुणीची ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
ऑनलाइन मद्य मागविणे पडले तरुणीला महागात
ऑनलाइन मद्य मागविणे पडले तरुणीला महागात Saam Tv
Published On

मुंबई : मैत्रिणी Friends बरोबर दारू पार्टीसाठी ऑनलाइन Online मद्य मागविणे, तरुणीला चांगलच महागात पडले आहे. त्या तरुणीची ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. मलबार हिल Malabar Hill पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Young woman has order liquor online

गावदेवी Gavdevi परिसरामधील रहिवासी २८ वर्षीय तरुणी ही १८ जून दिवशी मैत्रिणीसोबत मलबार हिल येथील राहणाऱ्या, अन्य मैत्रिणीला भेटण्यासाठी जात होती. या दरम्यानच, या दाेघींपैकी एकीने गुगलवरुन Google ऑनलाइन मद्य Alcohol विक्री करणाऱ्या, वेबसाइटचा website शोध घेतला.

हे देखील पहा-

साईटवर आलेल्या क्रमांकावर कॉल call करून मद्याची ऑर्डर Order दिली होती. नंतर समोरून बोलणाऱ्या, व्यक्तीने वाईनच्या ऑर्डरचे झालेले १ हजार ७२० रुपये बिल पाठविण्यासाठी त्यांना एक क्यूआर QR कोड पाठविला होता. तरुणीने पेटीएम Paytm ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन Scan करून पैसे पाठवले. Young woman has order liquor online

ऑनलाइन मद्य मागविणे पडले तरुणीला महागात
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने, मुलीने केली आत्महत्या

२ तास झाले तरी देखील ऑर्डर न मिळाल्याने, तरुणीने संबंधित क्रमांकावर कॉल केले व विचारणा केली. यावरून तिने पैसे रिफंड Refund करण्यास सांगितले होते. दरम्यान, ऑर्डर रद्द करण्याच्या नावाखाली तिच्या खात्यामधून तब्ब्ल ६० हजार रुपये काढण्यात आले आहे. तिला फसवणूक झाल्याचे, लक्षात येताच त्यांनी मलबार हिल पोलीस Police ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार, मलबार हिल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com