Pune News: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने केला आयुष्याचा शेवट; चिठ्ठीतून धक्कादायक कारण आलं समोर

Deboo Rajan Khan News: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या २८ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Debu Rajan Khan News
Debu Rajan Khan NewsSaam tv
Published On

Deboo Rajan Khan Ends Life:

ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या २८ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील मावळच्या सोमटने फाटा येथे ही घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडल्याची माहिती समोर आली. डेबू राजन खान असं त्याचं नाव होतं. वयाच्या २८ व्या वर्षी डेबूने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. डेबूने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डेबूने राहत्या घरीच जीवन संपवलं आहे. डेबूचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला. त्यानंतर त्याच्या भावाने त्याला रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डॉक्टरांकडून डेबूला मृत घोषित करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याता आला, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.

भावाने त्याच्या घराचे दार ठोठावले, पण...

ज्येष्ठ लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू आयटी अभियंता होता. डेबू हा सोमटने फाटा इथं एकटाच राहत होता. त्याने सोमवारी सकाळपासून घराचं दार उघडलंच नाही. यामुळे दुपारी घर मालकिणीने डेबूच्या भावाशी संपर्क साधला.

त्यानंतर भावाने डेबूशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे भावाने सोमटने फाटा गाठलं अन् घराचे दार ठोठावले. पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर त्याच्या भावाने तळेगाव पोलिसांशी संपर्क साधला.

Debu Rajan Khan News
Pune Crime News: पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर; फक्त बघितलं म्हणून 2 तरुणांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला

पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्याने घरात आत्महत्या केल्याचे आढळून आले. डेबूने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. डेबूने लिहिलेल्या चिठ्ठीत आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचं आणि त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे.

त्याचबरोबर ज्या लोकांसोबत पैश्यांची देवाण-घेवाण केली, त्यांची नावं देखील नमूद केली आहेत. दरम्यान, त्या चिठ्ठीच्या आधारावर तळेगाव पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह ज्येष्ठ लेखक राजन खान यांना देण्यात आला आहे.

Debu Rajan Khan News
Kolhapur Crime News: संतापजनक! गतिमंद मुलीवर नराधमाने केला अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस आला प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com