सचिन गाड, साम प्रतिनिधी
वरळी हिट अँड रन प्रकरणात मुंबई पोलिसांना न्यायालयाने मोठा झटका दिलाय. अपघात प्रकरणात राजेश शहा यांची करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाने राजेश शहा यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आलीय. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच शिंदे गट शिवसेनेचे उपनेते शहा यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर कोर्टाने १५००० रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केलाय.
वरळी हिट अँड रन प्रकरणात दोषी असलेला मिहीर शहा हा अद्याप फरार आहे. तर मुंबई पोलिसांनी मिहीर शहाचे वडील आणि शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले, परंतु कोर्टाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत पोलिसांना झटका दिला. कोर्टाने अटक बेकायदेशीर ठरवत राजेश शहा यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन कोठडी होताच शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांनी केला जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.
दरम्यान या अपघातातील मुख्य दोषी मिहीर शहा हा शिवसेना उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. अपघात झाल्यापासून मिहीर हा फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्धात लूक ऑउट नोटीस जारी केलीय. दरम्यान या अपघाताचा अजून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. या फुटेजमध्ये मिहीर शहा याला अपघात झालेलं असल्याचं समजलं असताना सुद्धा त्याने कार सुसाट पळवली. तर कारच्या बंफर आणि चाकात अडकलेल्या कावेरी नाकवा यांना बाजुला केल्यानंतर मिहीरने पुन्हा त्यांच्या अंगावर कार चढवली होती. याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. दरम्यान या अपघाताचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमधून झाला होता.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील दोषींना शिक्षा होणारच, कोणालाच सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. विरोधकांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान भविष्यात अशा घटना घडू नये, म्हणून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवली जाईल. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारवर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.