Worli Hit And Run Case: अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता इशारा

Chief Minister Eknath Shinde : वरळीमधील हिट अँड रन प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलंय. विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहे. त्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय.
Worli Hit And Run Case: अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचा उद्धव  ठाकरेंना नाव न घेता इशारा
Chief Minister Eknath Shinde Saam TV
Published On

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाच्या नावाने पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर जारी केलंय. तर शिंदे गट शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या हिट अँड रन प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून शिवसेना नेत्याचा मुलगा दोषी असल्याने राजकारण तापलंय.

हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. हे आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी आज विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी या प्रकरणावरुन राजकारण करू नये. कोणी मोठा माणूस असेल तरी कोणाला सोडलं जाणार नाही. कोणाचाही जीव महत्वाचा आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. जर यावरुन राजकारण केलं जात असेल तर अडीच वर्ष काय घडलं हे सांगावं लागेल, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता दिलाय.

वरळी अपघात प्रकरणात पोलीस तपासाला वेग आला असून पोलिसांनी मुख्य दोषी मिहीर शहाच्याविरुद्धात लूक आऊट सर्क्युलर जारी केलंय. तर शिवसेनेचे उपनेते राजेश शहा आणि कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पडकत दोषी व्यक्तींना वाचवलं जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर बोलतांना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना इशारा दिलाय.

कोणी मोठा माणूस, असेल तरी कोणाला सोडलं जाणार नाही. कोणाचाही जीव महत्वाचा आहे. आता राजकारण करू नका असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी अडीच वर्षात काय घडलं ते सांगू असा सज्जड दम विरोधकांना दिलाय. दरम्यान राज्यात घडणाऱ्या हिट अँड रन प्रकरणे होऊ नये, म्हणून त्यावर कारवाई केली जाणार आहे. ड्रंक आणि ड्राइव्ह मोहीम राबवण्यात येणार आहे. उशिरापर्यत चालवल्या जाणाऱ्या बारवर कारवाई केली जाईल,असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

Worli Hit And Run Case: अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचा उद्धव  ठाकरेंना नाव न घेता इशारा
Eknath Shinde: मुंबई तुंबली, लोकल थांबली, नालेसफाईचे तीनतेरा; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले, पाहा VIDEO

दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पडणाऱ्या पावसाचा आढावा घेत, सर्व परिस्थितीची माहिती दिलीय. मुंबईत २०० ते ३०० mm पाऊस पडलाय. अतिवृष्ठीसारखी परिस्थिती निर्माण होते पण इकडे त्यापेक्षा जास्त पाऊस पडलाय. पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झालीय. रेल्वेचे २०० पंप आणि बीएमसी चे ४८१ पंप सुरू आहेत. तात्काळ पाणी निचरा करण्याचे काम सुरू आहे. होल्डिंग पॉइंटचा मोठा फायदा झालाय. माइक्रो टॅनेलिंगचा चांगला फायदा झालाय. मी सकाळपासून रेल्वे आणि पालिका यांच्या संपर्कात होतो. पाण्याचा निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे, त्या ठिकाणी सेवा तात्काळ देण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com