Badlapur Auto Driver News: शाब्बास रे पठ्ठ्या! बदलापूरच्या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; 12 तोळे सोनं असेलेली बॅग प्रवाशांना केली परत

Badlapur News: मात्र तोपर्यंत रिक्षा तिथून निघून गेली होती. चिंतेत असलेल्या पाथरे कुटुंबीयांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली.
Badlapur Auto Driver News
Badlapur Auto Driver NewsSaam TV
Published On

अजय दुधाणे

Badlapur News:

सध्या सोन्याचा भाव गगनाला भीडला आहे. वाढत्या दरांमुळे सध्याच्या काळात सोनं सर्वांसाठीच महत्वाचं आहे. सोन्याचे दागिने घालून अनेक जण मिरवतात. अनेकदा दागिने चोरीला जातात, तर काहीवेळा आपल्याच चुकीने आपण विसरून जातो आणि दागिने हरवाता. दागिने हरवलव्यावर प्रामाणिकपणे ते परत करण्यासाठी फार मोठं मन लागतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Badlapur Auto Driver News
CCTV Viral Video: दुचाकीवरून दोन मुली खाली कोसळल्या; वाचवायचं सोडून तरुण स्कुटी घेऊन फरार... घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

अशा पद्धतीने दागिने किंवा पैसे सापडले तर हे देवाने आपल्यालाच दिलेत असा समज करून व्यक्ती ते स्वत: जवळच ठेवतात. मात्र पैशांचा मोह न करता आजूही माणुसकी शिल्लक आहे. याची प्रचिती बदलापूरमधील एका रिक्षा चालकाने घडवून आणलीये.

बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव रिक्षाने प्रवास करणाऱ्या कुटुंबाला आलाय. बदलापुरातील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात १२ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना परत केलीये. अजय पाटेकर असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. सध्या रिक्षा चालकाचं शहरात सर्वत्र कौतुक होतंय.

बदलापूरच्या दत्तवाडीत राहणाऱ्या वनिता पाथरे या आपल्या कुटुंबासह मुंबईकडे लग्नासाठी निघाल्या होत्या. त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं. मात्र काही वेळाने त्यांना आपल्या जवळ असलेली एक बॅग रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं.

मात्र तोपर्यंत रिक्षा तिथून निघून गेली होती. चिंतेत असलेल्या पाथरे कुटुंबीयांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली. त्यावर त्यांनी तात्काळ रिक्षा चालकांना याबाबत माहिती कळवली आणि काही वेळातच या बॅगचा शोध लागला. या पूर्वी अशा घटना घडल्या असून आमचे रिक्षा चालक प्रामाणिकपणे विसरलेल्या वस्तू प्रवाशांना परत करतात अशी माहिती किशोर देशमुख यांनी दिली.

तर नागरिकांनी देखील प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेऊन प्रवास करावा असं आवाहन देखील वाहतूक विभागाचे पोलीस उप निरीक्षक बाळू लभडे यांनी केलं आहे.

Badlapur Auto Driver News
Gautam Gambhir On Virat Kohli: 'आमची भांडणं फक्त मैदानात..',विराटबाबत गंभीरचं मन जिंकणारं वक्तव्य; Video पाहायलाच हवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com