Bandra Band stand : वांद्रे बँड स्टँड समुद्रात महिला बुडाली, BMCच्या लाईफगार्ड्सकडून शोध सुरु

Women Drown in Mumbai sea : ज्योती सोनार (२७ वर्ष)असं समुद्रात बुडालेल्या महिलेचे नाव असून जीव रक्षकांकडून बचाव कार्य सुरू आहे.
Band Stand Bandra
Band Stand BandraSaam Digital
Published On: 

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड परिसरात महिला बुडाल्याची माहिती समोर येत आहे. काही पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी आले होते त्या पर्यटकांपैकी एक महिला समुद्रात बुडाल्याची घटना पुढे आली आहे.

संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही महिला दगडावरून पाय घसरून समुद्रात पडल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस कंट्रोल रूमला 7.15 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली

त्यानंतर आता मुंबई पोलिसांसह मुंबई महापालिकेचे जीवरक्षक यांनी महिलेचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. ज्योती सोनार (२७ वर्ष)असं समुद्रात बुडालेल्या महिलेचे नाव असून जीव रक्षकांकडून बचाव कार्य सुरू आहे. (Latest Marathi News)

Band Stand Bandra
Mumbai Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून बांबूने बेदम मारहाण, पीडित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

परभणीत दोघांचा मृत्यू

 धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बुडून मृत्यू झाला आहे.  परभणीतील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या गेटजवळ ही घटना घडली आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे.

Band Stand Bandra
Actor Shramesh Betkar : श्रमेश बेटकरच्या पोस्टमुळे शेतकरी आक्रमक; आंदोलन करत सदाभाऊ खोतांचा निर्वानीचा इशारा

रत्नागिरीतही दोघेजण बुडाले

रत्नागिरी-चिपळूणमधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाल्याची घटना समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी नदीच्या डोहात आंघोळ करण्यासाठी गेले होते. बुडालेले दोघेही दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. अतिक बेबल आणि अब्दुल लसने अशी बेपत्ता दोन मुलांची नावे आहे. शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.