Actor Shramesh Betkar : श्रमेश बेटकरच्या पोस्टमुळे शेतकरी आक्रमक; आंदोलन करत सदाभाऊ खोतांचा निर्वानीचा इशारा

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी श्रमेश बेडकर यांच्या पोस्टवर चिखलफेक करून निषेध व्यक्त केला.
Actor Shramesh Bedkar
Actor Shramesh BedkarSaam Tv
Published On

Sangli News : वाढलेल्या टोमॅटोच्या दरावरुन सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. मात्र टोमॅटोच्या दरावरून केलेल्या जोकवरुन हास्यजत्रा फेम अभिनेता, लेखक श्रमेश बेटकर चांगलाच अडचणीत सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी श्रमेश बेटकर याने टॉमेटोचे भाव वाढल्याने टॉमॅटो बॅंकेत ठेऊ की फ्रिजमध्ये ठेऊ अशी खिल्ली उडवत शेतकऱ्यावर विनोद केला होता. याला विरोध करत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील भाटवडे येथील शेतकऱ्यांनी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी श्रमेश बेडकर यांच्या पोस्टवर चिखलफेक करून निषेध व्यक्त केला.

श्रमेश बेडकर हा हास्य जत्रेच्या दलालीवर जगतो आणि कष्टकरी शेतकऱ्यांवर विनोद करतो. आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेलं खातो. पुन्हा असे विनोद झाले तर श्रमेशला टोमॅटोच्या ज्यूससहित आणखी बरेच काही दिले जाईल, असा इशाराही यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला.(Latest Marathi News)

Actor Shramesh Bedkar
Parbhani Ratngiri News : परभणीत पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू, रत्नागिरीतही 2 शाळकरी मुले बुडाले

तर शहरी भागात राहून विनोद करणाऱ्यांनी एकदा शेतात येऊन कष्ट करून पहावे. त्यांना एकदा माती लागू दे, म्हणजे भजीपाल्याला दर किती असावा यावर विनोद सुचेल, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लागवला. (Political News)

Actor Shramesh Bedkar
NCP Mla Big Announcement : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार अतुल बेनकेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांना धक्का

काय म्हटलं होतं श्रमेशने?

इन्स्टा स्टोरीमध्ये श्रमेशने त्याच्या प्रसिद्ध अकबर-सलीम स्किटमधील स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. त्यात एकाच वाक्यामध्ये त्याने टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत उपहासात्मक कमेंट केली होती. 'सकाळपासून एकच गोष्ट कळत नाही, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत', अशी पोस्ट श्रमेशने केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com