NCP Mla Big Announcement : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार अतुल बेनकेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांना धक्का

Political News : साहेब की दादा यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम सुरु आहे.
NCP Mla Atul Benke
NCP Mla Atul BenkeSaam TV
Published On

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कार्यकर्ते, नेत्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. शरद पवारांसोबत जायचं की अजित पवारांसोबत जायचं या द्विधा मन:स्थितीत नेते सापडले आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचीही हीच परिस्थिती झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

साहेब की दादा यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम सुरु असताना या राजकारणाला कंटाळून आमदार अतुल बेनके यांनी हा निर्णय घेतला. यापुढे विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.

NCP Mla Atul Benke
Political News : चंद्रशेखर बावनकुळेंवर बोलताना तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे कपडे फाडू, प्रसाद लाड यांचा अरविंद सावंतांना इशारा

अतुल बेनके यांनी आजच दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत आपली भुमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर काहीच वेळात यापुढे विधानसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांना जिकडे जायचं तिकडे जावं, मी तटस्थ रहाणार असल्याचं बेनके यांनी म्हटलं आहे.  (Political News)

NCP Mla Atul Benke
Sushma Andhare : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे सर्वात गंभीर आरोप; वैजनाथ वाघमारे नेमकं काय म्हणाले?

निवडणूक लढणार नाही, परंतु समाजकार्यातून जुन्नरच्या जननेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणार आहे. पाणी प्रश्नासाठी संघर्ष करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. अतुल बेनके यांच्या या धक्कादायक निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com