उघड्या गटारात पडून महिलेचा मृत्यू; विवर येथील धक्कादायक घटना

या प्रकरणी विरार पोलिसांनी अपपमृत्यूची नोंद
Virar News
Virar NewsSaam Tv
Published On

विरार - उघड्या गटारात कडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विरार येथे उघडकीस आली आहे. कमलाबेन मेहता(६८) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी (Police) अपपमृत्यूची नोंद केली आहे. विरार (Virar) पश्चिमेच्या एमबी इस्टेट मध्ये राहणाऱ्या कमलाबेन शहा या दररोज सकाळी विरारच्या जैन मंदिरात जायच्या.

Virar News
दुर्दैवी! परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला; मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचालकाचाही मृत्यू

सोमवारी जैन मंदिरात होणाऱ्या एका धार्मिक प्रवचनासाठी त्यांनी पहाटेवसाडेपाच वाजता घर सोडले होते. सकाळचे आठ वाजले तरी त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला होता. मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. त्या बेपत्ता होऊन २४ तास उलटले नसल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी समाज माध्यमाद्वारे त्यांना शोधण्यासाठी आवाहन केले होते.

दरम्यान, संध्याकाळी पाच वाजता विरारच्याच एमबी इस्टेट परिसरात असलेल्या एका गटारामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. विरार पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या कमलाबेन मेहता यांचा असल्याचे नंतर उघड झाले

मेहता यांना स्मृतिभ्रंश तसेच मणक्याचा आजार होता. त्यांचा मृतदेह गटारातून बाहेर काढण्यात आला आहे. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com