पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेची मुलासह आत्महत्या

पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेने आपल्या सात वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरीच्या चांदिवली येथील नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत घटना घडली आहे.
पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेची मुलासह आत्महत्या
पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेची मुलासह आत्महत्याSaam Tv

सुरज सावंत

मुंबई - पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेने आपल्या सात वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरीच्या चांदिवली येथील नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत घटना घडली आहे. रेश्मा त्रेंचिल(44) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत गरूड त्रेंचिल (7) या मुलाचा मृतदेह सापडला आहे. Woman commits suicide with child after death of her husband

हे देखील पहा -

सोमवारी घडलेल्या या प्रकारापूर्वी ३० मे ला या महिलेने फेसबुकवर एक पोस्ट अपलोड केली होती. त्यात कोरोनामुळे पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे रेश्माने फेसबुक पोस्टवर पतीच्या मृत्यूनंतर परिस्थिती खालवल्या बाबत लिहिले होते. शरद असे रेश्माच्या पतीचे नाव होते. ते ऑनलाई ट्रेडिंग प्लॅटफोर्वर अ‍ॅग्रीकल्चरल कमोडिटी विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. रेश्मा ही गृहिणी होती.

रेश्माचे सासू - सासरे वाराणसीमध्ये राहतात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना योग्य उपचार मिळावे म्हणून शरद हे वारणसीला गेले होते.पण दुर्दैवाने त्यांनाही कोरोना झाला. चार महिने कोविडशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांंचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर रेश्मा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात पतीच्याअचानक झालेल्या निधनामुळे जीवन कसे बदलले आहे हे फेसबुकवर पोस्ट लिहत मांडले होते.

पतीच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर महिलेची मुलासह आत्महत्या
Breaking -विजयसिंह मोहिते-पाटील यांचे 'या' कारणासाठी उपोषण 

जीवनात कशा अडचणी आल्या आहेत, याबाबत त्यांनी लिहीले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे याचरेश्माने याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रेश्माच्या घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. याप्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com