Breaking -विजयसिंह मोहिते-पाटील यांचे 'या' कारणासाठी उपोषण 

अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये करण्यासाठी या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आजपासून‌‌ अकलूज प्रांत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
Breaking -विजयसिंह मोहिते-पाटील यांचे 'या' कारणासाठी उपोषण 
Breaking -विजयसिंह मोहिते-पाटील यांचे 'या' कारणासाठी उपोषण भारत नागणे
Published On

भारत नागणे

पंढरपूर - अकलूज Akluj आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये करण्यासाठी या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आजपासून‌‌ अकलूज प्रांत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी जाणून-बुजून नगर परिषदेचा प्रस्ताव अडवल्याचा आरोप करत, जर निर्णय झाला नाही तर संतांच्या पालख्या पुढे पंढरपूरला Pandharpur जीवू देणार नाही असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला‌ आहे. Vijay Singh Mohite-Patils fast for this reason

हे देखील पहा -

आशिया खंडामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया २०१८ पासून सुरू आहे सोबतच नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलेला आहे. मात्र राज्यांमध्ये सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांच्या vijay singh mohite patil ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रुपांतर व्हायला अडथळा निर्माण झालेला आहे.

Breaking -विजयसिंह मोहिते-पाटील यांचे 'या' कारणासाठी उपोषण 
धुळ्यात शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप

आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.जो पर्यंत दोन्ही ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपरिषद मध्ये होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार मोहिते पाटील यांनी केला आहे.

अलीकडेच मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप मध्ये आले आहेत. वर्ष अखेरीस सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मधून विधान परिषद निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वूभूमीवर राष्ट्रवादीने आता राजकीय रंग देण्यास सुरुवात केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com