Why garlic prices hike : सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील फोडणी महागली; लसूण ४०० पार, कधीपर्यंत हीच किंमत राहणार?

Garlic market price : सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील फोडणी महागली आहे. लसूण ४०० पार झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा मोठा फटका बसत आहे.
सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील फोडणी महागली; लसूण ४०० पार, कधीपर्यंत हीच किंमत राहणार?
Why garlic prices are up Saam tv
Published On

मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. किरकोळ बाजारातील लसणाचा दर थेट ४०० रुपये प्रति किलो पार गेला आहे. लसणाचा हा भाव येत्या काही दिवसांत ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लसणाच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार हे नक्की.

दररोजच्या आहारात लसणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. यंदा लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढत आहेत. जुन्या लसणाची आवक जवळपास संपली आहे. त्यामुळे बाजारात नवीन लसूण उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या बाजारात लसणाचे दर प्रचंड वाढेलेले आहेत. यावर्षी देशातील लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत असल्याची मिळत आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य नागरिक काटकसर करुन आयुष्य जगत आहेत. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी महागडा लसूण विकत घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील फोडणी महागली; लसूण ४०० पार, कधीपर्यंत हीच किंमत राहणार?
Garlic Price: लसणाची फोडणी महागली; किरकोळ बाजारात दर थेट ४०० रुपयांवर

याआधी जानेवारी महिन्यात देखील लसणाच्या दराचा मोठा भडका उजडाला होता. वाढलेला भाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा ऑगस्टमध्ये भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात लसूण ४०० रुपये दराने विकला जात आहे. तर घाऊक बाजारात दर कमाल ३०० रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

महागलेल्या लसणाचा दर किती दिवसांनी कमी होतील, असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे. जानेवारी ते मे या कालावधीत नवीन लसूणचे उत्पादन होतं. त्यानंतर आवक फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होतं. त्यामुळे संपूर्ण वर्ष सर्वसामान्यांना महागडा लसूण खावा लागणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचलक प्रदेश येथून लसणाची आवक होत असते. तर लसणाचा भाव वाढत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याचं निश्चित झालं आहे.

'महागाईत पगार का वाढत नाही?'

अभिनेत्री चिन्मयी जोगळेकर म्हणते,एखाद्या वस्तूचा भाव वाढल्यास दुकानदार देखील चढ्या दराने विक्री करतो. वस्तू महाग झाल्याचे सांगून दुकानदार चढ्या दराने वस्तू विकतो. महागाई झाली तरी नोकरदारांचा पगार वाढत नाही. महागाई वाढल्यास सर्वसामान्यांच्या पगारात वाढ करायला पाहिजे. त्यामुळे त्यांना ती वस्तू खरेदी करण्यास सक्षम होतील. लसूणच नव्हे टॉमेटोच्या दरात देखील वाढ झाली आहे. प्रत्येक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत'.

'शेतकऱ्यांना फायदा होतो का?'

'लहानपणी बाजारात कोंथिबीर महाग असायची, तेव्हा विकत घ्यायला टाळायचो. आता वस्तू महाग होतात, तरी लोक वस्तू खरेदी करत असतात. यामुळे वस्तूची आयात कमी होईल. या वस्तू महाग होत असताना याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो, हे पाहायला हवं. बाजारात लसूण, कांदे महाग होत असताना शेतकरी फायद्यात आहे का, हे पाहावे लागेल, अशा गृहिणी निता नलावडे म्हणाल्या.

सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील फोडणी महागली; लसूण ४०० पार, कधीपर्यंत हीच किंमत राहणार?
Vegetables Rate: पावसाचा सर्वसामान्यांना फटका!भाजीपाल्यांचे दर कडाडले,जाणून घ्या किंमती?

मेथी भाजीची आवक कमी झाल्याने दर वाढले

मनमाड परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मेथी भाजीची लागवड केली होती. मात्र सध्या आवक कमी झाल्याने अवघ्या तीन दिवसापूर्वी ठोक बाजारात ३५०० रुपये शेकडा दराने विक्री होत असलेल्या मेथी भाजीचा दर दुपटीने वाढला आहे. त्यामुळे मेथी जुडीला शेकडा ७९०० ते ७३०५ इतका दर मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारत मेथीचे दरात चांगलीच वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com