Maharashtra politics : एकनाथ खडसेंच्या घरवापसीत कोणाची आडकाठी? भाजप प्रवेश का रखडलाय?

Eknath Khadse and maharashtra political News : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडलाय. एकनाथ खडसे यांचा रखडलेला भाजप प्रवेश आणि त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाचा आढावा घेणारा खास रिपोर्ट पाहूया.
 एकनाथ खडसेंच्या घरवापसीत कोणाची आडकाठी? भाजप प्रवेश कशामुळे रखडलाय?
Eknath KhadseSaam Tv

तन्मय टिल्लू, मुंबई

मुंबई : भाजपचे माजी महसुल मंत्री एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडलाय. लोकसभा निवडणुकीत त्यांची घरवापसी थंड बस्त्यात गेलीये. मात्र यामागे काही राजकीय खेळी केली जातेय का? खडसेंना सक्तीची राजकीय निवृत्ती देण्याचा गेम खेळला जातोय का? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. खडसेंचा रखडलेला भाजप प्रवेश आणि त्याभोवती रंगणाऱ्या राजकारणाचा आढावा घेणारा खास रिपोर्ट पाहूया.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी भाजपत घरवापसीची घोषणा करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अडचणीत आणलं. मात्र खडसेंचा राजकीय गेम होतोय की काय अशी स्थिती आता निर्माण झालीय. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उत्साहात भाजप प्रवेशाची घोषणा करणाऱ्या खडसेंची अद्याप घरवापसी झालेली नाही. प्रवेशासाठी त्यांना ताटकळत ठेवण्यात आलंय. त्यामुळे एकनाथ खडसेंचा प्रवास सक्तीच्या राजकीय निवृत्तीकडे जातोय का? असा सवाल उपस्थित झालाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यांच्याकडे जवळपास 11 खात्यांचा कार्यभार होता. पर्यायी सत्ता केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्याचाच राजकीय फटका त्यांना बसल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. भाजपच्या मुशीत तयार झालेले खडसे काही काळासाठी राष्ट्रवादीत गेले खरे, मात्र तिथं ते फारसे रमले नाहीत.

खडसेंची घरवापसी झाल्यास हे फडणवीसांना अप्रत्यक्ष आव्हान देखील असेल. त्यामुळे आगामी काळात खडसेंना भाजप नेत्यांकडून प्रवेशासाठी ताटकळत ठेवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे फडणवीसांचं राजकीय वजन कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही न असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय.

 एकनाथ खडसेंच्या घरवापसीत कोणाची आडकाठी? भाजप प्रवेश कशामुळे रखडलाय?
Dombivali MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केल्यास मतदारसंघाची जबाबदारी खडसेंचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजनांकडे देण्यात आलीये. त्यात मंत्री महाजन हे उपमुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. महाजनांनी प्रत्येक प्रकरणात प्रत्येक टप्प्यात खडसेंशी प्रखर शत्रुत्व घेतलं. खडसेंच्या पक्षप्रवेशानं जळगाव जिल्ह्यातील राजकारणात नवा पेच निर्माण होऊ शकतो. भाजपत दोन सत्ता केंद्र झाल्यास त्याचा फटका गिरीश महाजनांना बसेल. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशात अडथळे निर्माण झाल्याची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगतेय.

 एकनाथ खडसेंच्या घरवापसीत कोणाची आडकाठी? भाजप प्रवेश कशामुळे रखडलाय?
Nagpur News: नागपुरात पावसाळ्यापूर्वी अल्पमुदतीची सर्व कामे वेळेत पूर्ण होणार : देवेंद्र फडणवीस

केंद्रातील नवी समीकरणं, ऐन लोकसभा निवडणुकीचा काळ आणि खडसेंनी घरवापसीची साधलेली वेळ यामुळे आगामी काळात महाराष्ट्र भाजपत बदलाचे वारे फिरु शकतात. सध्यातरी खडसे ना राष्ट्रवादीत ना भाजपमध्ये अशी स्थिती आहे. एक प्रकारे ही त्यांची सक्तीची राजकीय निवृत्ती ठरावी, अशा हालचाली भाजपच्या गोटातूनच केल्या जातायत का? असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर जळगावच्या राजकारणात काय घडतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com