
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला काल शुक्रवारी मारहाण झाल्याची घटना समोर आली. घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हा प्रकार घडला आहे. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळने ही स्पर्धा आयोजित केली होती. काल रात्रीच्या वेळी कुस्तीची स्पर्धा सुरु असताना निलेश घायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला होता. त्यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या एका तरुण पैलवानाने निलेश घायवळच्या कानशिलात लगावली. यानंतर कुस्तीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. पैलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते. त्याने संबंधित पैलवानाला चांगलाच फोडला.
घायवळवर हल्ला करणारा तो नक्की कोण आहे? तो कोणत्या टोळीमधला सदस्य आहे का? घायवळवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहेत. वाशी पोलिसांनी निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं असून त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
सागर मोहोळकर नक्की कोण?
सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पैहलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला आला होता. निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, सागर मोहोळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली? याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं आहे. वाशी पोलीसांकडून त्यांची कसून चौकशी करत आहे. पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात केलेली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.