Nilesh Ghaywal : कुस्तीच्या फडात निलेश घायवळला का चोपलं? समोर आलं मोठं कारण, घायवळने...

Attack on Nilesh Ghaywal : सागर मोहोळकर या तरुण पहेलवानाने निलेश घायवळच्या कानशि‍लात लगावली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पहेलवान सागर मोहोळकर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे.
Nilesh Ghaywal attack
Nilesh Ghaywal attackSaam Tv News
Published On

धाराशिव : काल शुक्रवारी रात्री उशिरा पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर एका तरुणाने हल्ला केला. घायवळ धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. त्यावेळी कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुस्तीच्या फडात एका तरुणाने अचानक घायवळच्या कानशिलात लगावली. आता त्याला मारण्याचं कारण समोर आलं आहे.

सागर मोहोळकर या तरुण पहेलवानाने निलेश घायवळच्या कानशि‍लात लगावली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पहेलवान सागर मोहोळकर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. तिथे सागर देखील आला होता त्याचवेळी गुंड निलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. यावेळी तो आयोजकांसोबत पहेलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत सागरने निलेश घायवळला कानशिलात लगावली.

Nilesh Ghaywal attack
Pune News : कॉलेजच्या क्लासला चालले सांगत घरातून निघाली; पुन्हा परतलीच नाही, भीमा नदीत तरुणीचा मृतदेह, अन् बॅग...

दरम्यान, आंदरूड गावातील कुस्ती आयोजक ज्ञानेश्वर गीते यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. गीते यांनी सांगितलं की, 'गावात काल दोन कुस्त्यांचे फड एकाचवेळी सुरू होते. एक राजकीय विरोधकांचा फड होता आणि एक सार्वजनिक गावाचा फड होता. राजकीय विरोधकांनी आयोजित केलेल्या फडात बाहेरील पहेलवानाला खेळवले. गावचा सार्वजनिक कुस्तीचा फड उधळण्यासाठी त्याला अधिकचं बक्षिस दिलं होतं. तो तरुण नशा करून आला होता, असंही गीते यांनी म्हटलं आहे.

गीते पुढे म्हणाले की, 'नशेत असलेला तरुण हा माझी कुस्ती लावा यासाठी तो मागणी करत होता. त्याने पंचांकडे मागणी केली मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. माझ्याकडे देखील त्याने ही मागणी केली होती. मात्र, आमच्या नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी आम्ही फेटाळून लावली. निलेश घायवळ देखील तिकडे होता. तो पहेलवानाला बक्षीस देत होता. पहेलवानांमध्ये घायवळ प्रसिद्ध असल्याने त्यांच्याशी संवाद साधला जात होता. त्यावेळी तो नशेखोर तरुण कुस्ती लावण्यासाठी मागणी करत होता. त्याचदरम्यान निलेश घायवळ आणि त्याच्यात बाचाबाची झाल्याचं गीते यांनी स्पष्ट केलं. घायवळ याला कोणत्याही मारहाण झाली नसल्याचं गीते यांनी स्पष्ट केलं आहे.

Nilesh Ghaywal attack
Beed Crime: गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चापका, लाकडी बांबूच्या काठीने देशमुखांना मारहाण, शरीरावर १५०हून अधिक जखमा; अहवालात काय काय? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com