Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Pune : पुण्यात उद्या गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि आकर्षक सजावटीतून होणार आहे. मानाच्या गणेश मंडळांसह दगडूशेठ गणपती, तुळशीबाग गणपती यांची विसर्जन मिरवणूक भव्य दिव्य होणार आहे.
Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Pune NewsSaam tv
Published On
Summary
  • पुण्यात उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सज्ज.

  • श्री कसबा गणपती, तुळशीबाग गणपती, दगडूशेठ गणपती मिरवणुका ठरणार विशेष आकर्षण.

  • ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक रथ सजावटीतून पुणेकर गणरायाला देणार निरोप.

  • पोलिस आणि प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा; लाखो भाविक पुण्यात सहभागी होणार.

पुणे शहरात उद्या गणेश विसर्जनाचा महापर्व सुरू होत असून संपूर्ण शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर आता गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी विविध मानाच्या मंडळांसह शहरातील हजारो गणेश मंडळांनी आपापली मिरवणूक सुसज्ज केली आहे. ढोल-ताशांच्या गजरात, नगारावादनात आणि आकर्षक सजावटीतून गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापाशी उद्या सकाळी साडेनऊ वाजता पालकमंत्री यांच्या हस्ते श्री कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात होईल. या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. मिरवणुकीत दोन ढोल-ताशा पथके, गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ आणि विविध सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे.

Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत सहभागी होईल. अब्दागिरी, मानचिन्ह आणि नगरावादनाच्या सुरात हा सोहळा पार पडणार आहे. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती ‘हर हर महादेव’ या फुलांनी सजवलेल्या रथातून सकाळी साडेनऊ वाजता मार्गस्थ होणार असून, स्वप्नील आणि सुभाष सरपाले यांनी या रथाची निर्मिती केली आहे. नगारा वादन आणि ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींना निरोप देण्यात येणार आहे.

Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Pune Ganeshotsav: मंगलमय सुरुवात! दगडुशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार महिलांनी केलं अथर्वशीर्ष पठण; VIDEO

यंदा मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळासाठी विशेष महत्त्वाचा क्षण आहे. कारण या मंडळाचा १२५वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यामुळे ३५ फूट उंच आकर्षक मयूर रथ सजवण्यात आला असून त्यावर श्री गणराय विराजमान होणार आहेत. परिसरातील व्यापारी आणि महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. लोणकर बंधूंच्या नगारावादनासोबत ढोल-ताशांच्या तालात या मंडळाचा विसर्जन सोहळा होईल.

Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Pune Ganeshotsav : पुण्यात पहिलाच प्रयोग! गणेश मंडळाकडून चक्क लेसर स्कॅनिंगने गणेशमूर्ती तयार

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती महात्मा फुले मंडईत लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू करेल. यंदा फुलांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची पारंपरिक मिरवणूक काढली जाईल. ढोल-ताशा पथकांसोबत इतिहासप्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धाराचा देखावा हा विशेष आकर्षण ठरणार आहे.

Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganeshotsav Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दोन दिवशी दारूची दुकाने राहणार बंद

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता बेलबाग चौकातून निघेल. दक्षिण भारतीय शैलीतील रथ आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला असून, कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी या रथाची निर्मिती केली आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी मानवसेवा रथ, सनई-चौघड्यांचा गजर, तसेच स्वरूपवर्धिनीचे विशेष पथनाचे वादन असेल.

Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganeshotsav 2025 : गणरायाला निरोप देण्यासाठी ढोलताशा पथकांच्या संख्येवर निर्बंध; पुण्यात गणेश मंडळांचा मोठा निर्णय

सायंकाळी सहा वाजता अखिल मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा श्री गणेश सुवर्णयानातून विसर्जन सोहळा सुरू होईल. जहाजासारखा भव्य २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद रथ आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला असून, कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी हा देखावा उभा केला आहे. अग्रभागी जयंत नारकर पेच यांचे नगारावादन, गंधर्व बँड आणि शिवगर्जना पथकाचे वादन होईल.

Ganeshotsav : पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganeshotsav 2025 : गणरायाला निरोप देण्यासाठी ढोलताशा पथकांच्या संख्येवर निर्बंध; पुण्यात गणेश मंडळांचा मोठा निर्णय

पुणेकरांसाठी विसर्जनाची रात्र ही केवळ श्रद्धेची नव्हे तर उत्साहाचीही असते. प्रशासनाने सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. पोलिस, स्वयंसेवक आणि विविध यंत्रणा दिवसरात्र तैनात असतील. यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणूक केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com