Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार

Pune : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील सर्वात मोठा दुहेरी उड्डाणपूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. २.५ किमी लांबीचा हा पूल पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देणारा ठरेल.
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील सर्वात लांब दुहेरी उड्डाणपूल सिंहगड रस्त्यावर वाहतुकीस खुला

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार

  • २.५ किमी लांबी व ११८ कोटी खर्चाचा प्रकल्प वेळेआधी पूर्ण

  • फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी प्रवास आता अधिक जलद आणि सोपा

पुणेकरांची वाहतूक कोंडीची चिंता दूर झाली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुण्यातील सर्वात मोठ्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचा आज लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता या उड्डाणपूलाचे उद्घाटन होणार असून, या सोहळ्याला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सिंहगड रस्ता हा पुण्यातील सर्वाधिक गजबजलेला मार्ग मानला जातो. फनटाईम थिएटरपासून विठ्ठलवाडीपर्यंतचा प्रवास हा नागरिकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक ठरत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. सुमारे २.५ किमी लांबीचा हा पूल हा केवळ सिंहगड रस्त्यासाठीच नव्हे तर संपूर्ण पुण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार
Pune : पोलिसांवर चाकूने हल्ला, कुख्यात गुंडाचा एन्काउंटर; पुण्यात नेमकं काय घडलं?

या प्रकल्पासाठी एकूण ११८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती आणि नियोजित वेळेनुसार फेब्रुवारी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणार होते. मात्र कार्यक्षम नियोजन आणि जलदगतीने केलेल्या कामामुळे हा पूल नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधीच वापरासाठी खुला करण्यात आला आहे.

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार
Pune News: १०० फूट उंच तेजस्वी प्रतिकृती! पुण्यातील दगडूशेठ मंडळाकडून यंदा केरळच्या मंदिराचा देखावा|VIDEO

या पुलाच्या माध्यमातून फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रचंड वाहन क्षमतेमुळे नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या उड्डाणपूलाच्या माध्यमातून आता नागरिकांचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार
Pune News: ठेकेदाराच्या निष्काळजीपणानं कामगाराचा जीव घेतला; ३ जणांवर गुन्हा दाखल

या उड्डाणपूलाच्या लोकार्पणानंतर सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक सुलभ होऊन शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहराच्या वाढत्या वाहतुकीसाठी हा पूल एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com