
नांदेड सिटीजवळ ड्रेनेज खोदकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला.
तीन कामगार दबले; त्यात एकाचा मृत्यू झाला.
ठेकेदार व इतर दोन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सुरक्षा खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचं पोलिस तपासात निष्पन्न.
सागर जाधव, साम प्रतिनिधी
पुण्यात नांदेड सिटीजवळ नदी सुधार योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनच्या खोदकामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. मातीचा ढिगारा कोसळल्यानंतर त्याखाली तीन कामगार दबल्या गेले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय.
नांदेड सिटी पोलिसांनी मुख्य ठेकेदारावरती गुन्हा दाखल केला आहे. मुख्य ठेकेदार नकुल अरविंदभाई हीरपारा, पोकलेन चालक खुर्चीद शेख, कामगार ठेकेदार सरोज रामसिंगासन सिंग, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या ठिकाणी खबरदारी न घेतली गेली नसल्याचं पोलिसांना आढळले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही घटनाच एका प्रकल्पाच्या नदी सुधार योजनेतील पाईपलाईन टाकण्याच्या कामदरम्यान घडली होती. या घटनेत बचाव पथकाने दोघांना सुखरूप बाहेर काढले होते. मात्र एका कामगाराचा मृत्यू झाला होता. नांदेड सिटी रस्त्यालगत पोकलेन मशीनने खोदकाम सुरू होते. त्यावेळी मातीचा ढिगारा अचानक कोसळला त्या ढिगाऱ्याखाली तिघेही अडकले होते. कामगारांना वाचवण्यासाठी पीएमआरडीए महापालिका अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले होतं.
पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाइनचं काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. या कामगारांना अग्निशमन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहेत. या घटनेत आतापर्यंत एका कामगाराला रेस्क्यू करून बाहेर काढलं आहे. तर दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.