Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पूल कधी सुरू होणार? आतापर्यंत किती काम झालं, किती खर्च आला?

What Is benefit of Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. नेमकं कोणत्या कारणाने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, हे जाणून घेवू या.
गोखले पूल
Gokhale BridgeSaam Tv
Published On

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. जवळपास सहा वर्ष हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दुसरा गर्डर सुरू करण्याचं महत्त्वपूर्ण काम पूर्ण केलंय. गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुल अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडतो. या उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवण्याचं काम देखील आता पूर्ण झालंय. रविवारी ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हे काम पूर्ण करण्यात आलंय. पुलाची दुसरी बाजू सुरु एप्रिल २०२५ मध्ये सुरू होईल, असं सांगितलं जातंय.

गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. तेव्हा पुलाची दुसरी बाजू कधी सुरू होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुलाचं बांधकाम सुरू होवून १५ महिने झाले होते, त्यानंतर पुलाची एक बाजू सुरू झालीय. पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार आणि पश्चिम रेल्वेने निर्देश दिल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत अखेर हे कामकाज पूर्ण करण्यात आलंय.

गोखले पूल वाहतुकीसाठी का बंद करण्यात आला?

अंधेरीतील प्रमुख आणि सर्वाधिक वाहतूक असलेल्या मार्गांपैकी एक गोखले पूल (Andheri Gokhale Bridge) आहे. गोखले पूल हा पुनर्बांधणीसाठी ७ नोव्हेंबर २०२२ पासून बंद केला गेला होता. महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून या पुलाची पाहणी करण्यात आली होती. गोखले पूलाचा एक भाग जुलै २०१८ मध्ये कोसळून अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून शहरामधील पुलांच्या सुरक्षिततेसाठी ऑडिट करण्यात आलं होतं. या ऑडिटनंतर पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गोखले पूल बंद झाल्यामुळे कोणत्या समस्या?

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर अंधेरीसह वांद्रे, दहिसरपर्यंतच्या परिसरात अनेक मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होत होती. ५ ते २० मिनिटे लागणाऱ्या अंतरासाठी मुंबईकरांना दीड ते दोन तासांचा वेळ लागत (Gokhale Bridge) आहे. गोखले पूल बंद केल्याने प्रवासाचा वाढलेला वेळ, इंधनाचा खर्च आणि आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण झाल्या होत्या. मुंबईत गोखले पूल बंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. नागरिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन देखील केले जात नव्हते. अंधेरी सबवे, मिलन सबवे, खार सबवे हे पर्यायी मार्ग वाहनचालकांना वापरावे लागत होते.

गोखले पूल
Hingoli Railway Bridge : वर्षभरापूर्वी केलेला हिंगोलीतील रेल्वे उड्डाणपूल खचला; भीषण अपघाताची शक्यता

गोखले पूलाचा फायदा काय?

अंधेरीतील गोखले पूल ८० मीटर लांब आणि २५ मीटर रुंद आहे. सुमारे ९० कोटी रुपये खर्चून नवीन रोड ओव्हरब्रिज तयार केला जातोय. २६ फेब्रुवारी रोजी पूल अर्धवटपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला (Mumbai News) होता. गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वाहनचालकांना मोडा दिलासा मिळणार आहे. कारण पूल बंद झाल्यापासून प्रवाशांना अंधेरी सबवेचा वापर करावा लागत होता. यामुळे जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल, तसेच वाहतूक कोंडीपासून देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

गोखले पूलाच्या कामाचा खर्च आणि टप्पे

गोखले पूलाच्या कामाला एकूण ९० कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती मिळतेय. गोखले पुलाचं काम २०२२ मध्ये पूर्ण होणार होतं. परंतु डिसेंबर २०२४ आणि एप्रिल २०१५ पर्यंत कामाची मुदत वाढविण्यात (Traffic Jam) आली. डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पुल तोडण्याचे काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवली गेलीय. एप्रिल २०२५ पर्यंत संपूर्ण काम पू्र्ण होवून पूल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती मिळतेय.

गोखले पूल
Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या; काय आहेत प्रमुख कारणं, तज्ज्ञ काय सांगतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com