मुंबई : एनएच-3 महामार्ग मुंबईला नाशिकसोबत जोडण्याचं काम करतो. नाशिक मुंबई महामार्ग चर्चेत राहण्याचं मोठं कारण त्याच्यावर असलेली गर्दी आहे. या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रवासी आणि वाहतूकदारांना बराच उशीर होतो. यामुळे प्रवासी देखील अत्यंत वैतागलेले आहेत.
मुंबई नाशिक महामार्गाची लांबी १४५ किलोमीटर आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. महामार्गावरील प्रचंड गर्दीने अनेक वर्षांपासून लक्ष वेधून घेतलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महामार्गाच्या दुरुस्तीत हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित एजन्सीला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु तरीदेखील ही समस्या सुटलेली (Mumbai Nashik Highway) नाही. याच प्रमुख कारण आहे की, या महामार्गाच्या कॉमसाठी एकही ठोस एजन्सी नाहीये. अनेक एजन्सी मिळून महामार्गाचं काम पाहत आहेत. भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या समस्येला कारणीभूत असल्याचं मत व्यक्त केलंय. यासंदर्भात तज्ज्ञ काय म्हणतात आणि काय सल्ला देतात ? हे आपण सविस्तरपणे जाणून घेवू या.
१४५ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग ठाण्यातील माजिवडा आणि नाशिकमधील द्वारका यांना जोडतो. या महामार्गावरून सुमारे दीड लाख वाहनं प्रवास करत असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार (Mumbai Nashik Highway traffic) मिळतेय. हे अंतर गाठण्यासाठी दोन तासांचे अंतर पुरेसं असल्याचं तज्ञ सांगतात, परंतु सध्या नाशिक मुंबई महामार्ग पार करण्यासाठी साडेचार तास वेळ लागतोय. या महामार्गावर पडघा आणि घोटी असे दोन टोलनाके लागतात. MSRDC, MMRDA आणि मुंबई रेल्वे या एजन्सी या महामार्गाचं काम बघत आहे. नाशिक ते वडपेमधील (१२२ किमी) महामार्गाचं काम NHAI बघते, तर MSRDC माजिवाडा ते वडपे (२३ किमी) या मार्गावरचं काम बघण्याचं काम करते. या रस्त्यावरील गर्दी वर्षभर पावसाळ्यात अधिकच वाढते. खड्ड्यांचं प्रमाण देखील वाढतं, त्यामुळे अनेकदा प्रवासाचा वेळ आठ तासांपेक्षा जास्त लागतो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिलेली आहे.
घोटी सिन्नर जंक्शन - या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे जड वाहतूक लगतच्या रस्त्यांवरून वळवण्यात आलीय.
पिंपरी फाटा- जंक्शनवर ग्रेड सेपरेटरचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्ता खराब झालाय. कसारा पूल मालवाहू वाहनांसाठी खुला करण्यात येत असल्याचे एजन्सींनी सांगितलंय.
कसारा पूल - रस्त्याच्या २५० मीटर लांबीच्या ओव्हरब्रिजचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे दोन्ही दिशांची वाहतूक मंदावली आहे.
आसनगाव - आसनगाव मध्य रेल्वेने रेल्वे ओव्हरब्रिजच्या नाशिककडे जाणाऱ्या लेनच्या अपग्रेडेशनचे काम हाती घेतलंय. त्यांनी वाहतूक ४ लेनवरून २ लेनपर्यंत मर्यादित केलीय. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी दिसते.
वासिन आणि खडवली नाका- एजन्सी अंडरपास बांधत आहेत. ते काम आणि सततच्या पावसामुळे या अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये रस्ता खराब झालाय.
वडपे- येथील कामामुळे टोल प्लाझापूर्वीच्या रस्ता अरुंद झालाय. सततच्या अवजड वाहतुकीमुळे लगतच्या रस्त्याची दुरवस्था झालीय.
माणकोली - भिवंडी-अंजूर लिंक रोड आणि माणकोली-अंजूर-दापोडे मार्गावरील असंख्य गोदामे उड्डाणपुलाच्या खाली या जंक्शनवर महामार्गाला विलीन होतात. भिवंडी-अंजूर लिंक रोडवरील नुकसानामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झालीय.
माजीवडे- राजनोली लेन अपग्रेडेशनच्या कामांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबईला जाणारे कळवा आणि कशेळी खाडी पूल काही किलोमीटर अंतरावर आहेत. या मार्गावर नऊ लेनमधून मल्टी-एक्सल ट्रकसह वाहने २X२ लेनमध्ये वळवावी लागतात. दोन्ही बाजूंच्या खाड्यांवर लेन पूल जोडण्याचे काम सुरू आहे.
रस्ता प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील वाहतुकीवर एजन्सींचा परिणाम होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या प्रश्नावर चर्चा झाली होती. एका MSRDC अधिकाऱ्याने हायवेसह गोदाम केंद्रांना जोडणाऱ्या ठाणे-वडापेच्या विभागातील BNMC च्या परिसरात माणकोलीच्या अरुंद रस्त्यांवरून मोठमोठे ट्रक आत जाण्याचा प्रयत्न (Traffic Jam) करतात. त्यामुळे महामार्ग खचत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. तर NHAI अधिकाऱ्याने वडपे-नाशिक विभागावरील आसनगाव रेल्वे ओव्हरब्रिजच्या अपूर्ण दुरुस्तीच्या कामामध्ये कसे अडथळे येत आहेत, यासंबंधी सांगितलं होतं. महामार्गाच्या दुरवस्थेचा बसचालक आणि वाहतूकदारांना देखील मोठा फटका बसत आहे. सुप्रीम ट्रॅव्हल्सचे के व्ही शेट्टी यांनी सांगितलं की, बसने प्रवासासाठी जास्त वेळ लागत असल्याने प्रवाशांनी ट्रेनची निवड केली. फक्त प्रवासी संख्याच कमी झालेली नाही, तर ऑपरेशनल खर्चावर देखील मोठा परिणाम होत आहे. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे इंधन जास्त प्रमाणात लागते. बसच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असल्यामुळे परिणामी तोटा सहन करावा लागतोय. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे खूप जास्त वेळ जातो. त्यानंतर महामार्गावरील ट्रकच्या हालचालींवरील नियमांमुळे मालाची वाहतूक करण्यास विलंब होतोय.
भिवंडी ते मुंबई दरम्यान माल पोहोचवण्यासाठी दोन दिवस सध्या लागत आहे, पूर्वी याच प्रवासासाठी केवळ १२ तास लागत होते. सर्वाधिक टोल भरून देखील ट्रकचालकांकडे सर्वाधिक दुर्लक्ष (Mumbai Nashik Highway lies broken) होत असल्याचं मुंबईतील वाहतूकदार आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अभिषेक गुप्ता यांनी म्हटलंय. महामार्ग आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल एजन्सी किंवा अधिकारी तैनात करण्याची गरज आहे, यावर तज्ञांनी भर दिलाय. मुख्यमंत्र्यांना एजन्सींनी नुकत्याच दिलेल्या सादरीकरणात नोडल ऑफिसरची गरज असल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं. नोडल ऑफिसर कामांवर देखरेख ठेवू शकतो. कामांचा एक पद्धतशीर आणि एकरूप प्रवाह निश्चित करू शकतो. रहदारीच्या हालचालींवर निर्णय घेणे आणि उपाय करणे, आणीबाणीच्या काळात तात्पुरते ट्रक टर्मिनल्स किंवा पर्यायी मार्ग विकसित करणे, असे विविध प्रश्न सोडवू शकतो, असं तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.