Weather Update : राज्याला उन्हाचा चटका, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज वाचा

Maharashtra Monsoon Today News Update : महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबईसह सहा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, तर सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये विजांसह हलक्या पावसाची शक्यता.
Maharashtra Weather Update News
Maharashtra Weather Update NewsAI image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रात मोसमी पावसाच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा प्रभाव

  • पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

  • सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update News Today : राज्यातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा हंगाम संपल्यानंतर आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागांत तापमानात वाढ जाणवत असून, ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा कडक ऊन आणि दमट हवामानामुळे उकाड्यात वाढ होत आहे. दरम्यान, आज काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकणातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट

कोकण विभागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उष्णतेसोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवू शकतो. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Weather Update News
Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सराफा बाजारात १ तोळे सोन्याची किंमत इतकी; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

एकीकडे राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढत असताना, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Maharashtra Weather Update News
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

उर्वरित महाराष्ट्रात उकाडा कायम

राज्यातील इतर भागांत अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने तापमानातील वाढ नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते. एकूणच, महाराष्ट्रात सध्या मिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com