Shocking : विरार हादरलं! बंद खोलीत आढळले ३ भावंडांचे मृतदेह; पोलिसांनी दरवाजा उघडला अन्...

Virar Crime News : विरारच्या ग्लोबल सिटी परिसरातील के-३ अव्हेन्यू इमारतीतील बंद घरात बहिण-भावांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बोळींज पोलिसांकडून तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.
Virar Crime News
Virar Crime News AI Image
Published On: 
Summary
  • विरारमध्ये धक्कादायक घटना

  • बंद फ्लॅटमध्ये आढळले ३ मृतदेह

  • आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

  • पुढील पोलीस तपास सुरु

मनोज तांबे, मुंबई

विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात बहिण-भावांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्लोबल सिटी येथील के-३ अव्हेन्यू इमारतीतील भाड्याच्या घरात हे मृतदेह आढळून आले. बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब विरारमधील ग्लोबल सिटी परिसरातील के-३ अव्हेन्यू इमारतीत भाड्याने राहत होते. घर अनेक वेळ बंद असल्याचे आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने बोळींज पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची पाहणी केली असता, घरात बहिण-भावांचे मृतदेह आढळून आले.

Virar Crime News
Bribe Case : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला १५ लाखांची लाच घेताना रंगे हात पकडलं

या घटनेतील एका भावाचे नाव कुमार मेहता असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका भावाला गंभीर आजार होता. त्याच्या उपचारासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिघांनी विषप्राशन केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Virar Crime News
Weather Update : 'अर्णब' चक्रीवादळाचा हाहाकार! महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमकी परिस्थिती समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com