Virar News: अर्नाळा समुद्रात बोट बुडाली, एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश

Boat Sank In Arnala Sea: रेती आणि विटांची वाहतूक करत असताना विरारच्या अर्नाळा समुद्रामध्ये बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
Virar News: अर्नाळा समुद्रात बोट बुडाली; एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश
Boat Sank In Arnala SeaSaam Tv

महेंद्र वानखेडे, विरार

विरारच्या अर्नाळा समुद्रात (Arnala Sea) बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बोटीमधून अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी आणि विटा वाहून नेण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक बोट बुडाली. या बोटीत एकूण १२ जण होते. त्यातील ११ जण सुरक्षित असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यापूर्वी अर्नाळा किल्ल्यातील (Arnala Fort) घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. दुरूस्तीच्या कामासाठी एका बोटीतून विटा आणि रेती नेली जात होती. मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकला आणि वेगात असलेली ही बोट समुद्रात बुडाली. पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे ११ जणांचे प्राण वाचले. हे सर्वजण सुखरूप होऊन किनाऱ्यावर पोहोचले.

Virar News: अर्नाळा समुद्रात बोट बुडाली; एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश
Mumbai Crime News: भयंकर! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार, मुंबईतील खळबळजनक घटना

या बोट दुर्घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष मुकने असं या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह बऱ्याच तासांनंतर सापडला. अर्नाळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्नाळा पोलिसांनी कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर आणि खासगी बोटी मार्फत बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला. अखेर २४ तासांनी या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Virar News: अर्नाळा समुद्रात बोट बुडाली; एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला गळती; मुख्य मार्गाला किती धोका? CM एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

दरम्यान, उजनी जलाशयामध्ये प्रवासी बोट उलडून ६ जणांचा मृत्यू झाला होता. या बोटीतील प्रवासी हे करमाळ्यावरून इंदापूरला येत होते. पण अचानक वादळ आणि पावसामुळे ही बोट बुडाली. या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. पती-पत्नी आणि दोन लहान मुलं यांचा समावेश होता. तर दुसरीकडे अमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेली एसडीआरएफ जवानांची बोट नदीमध्ये बुडाली होती. या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता.

Virar News: अर्नाळा समुद्रात बोट बुडाली; एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश
Pune Accident News : ‘पोर्शे' कारच्या आरटीओ तपासणीत धक्कादायक माहिती उघड; अपघाताचे नवे धागेदोरे हाती लागणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com