Kalyan : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट; एका स्कुटीवर चार जणांचा प्रवास, Video व्हायरल

Kalyan Viral Stunt Video News : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका स्कुटीवर चार अल्पवयीन मुलं हेल्मेटशिवाय भरधाव प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
KALYAN WEST VIRAL VIDEO OF FOUR MINORS RIDING SCOOTER WITHOUT HELMETS SPARKS OUTRAGE
KALYAN WEST VIRAL VIDEO OF FOUR MINORS RIDING SCOOTER WITHOUT HELMETS SPARKS OUTRAGESaam Tv
Published On
Summary
  • कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात स्कुटीवर चार अल्पवयीन मुलांचा धोकादायक प्रवास

  • स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • चौघांपैकी एकाही मुलाने हेल्मेट घातलेले नव्हते

  • कल्याण वाहतूक पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत तपास सुरू केला आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan West Khadakpada Boys Stunt Viral Video कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्लॉवर व्हॅलीसमोरील मुख्य रस्त्यावर एका स्कुटीवर चार अल्पवयीन मुलं बसून भरधाव वेगात प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Kalyan Viral Video) एक अल्पवयीन मुलगा स्कुटी चालवत असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी तीन मुलं अत्यंत धोकादायक पद्धतीने दुचाकीवर बसलेली आहेत. विशेष म्हणजे, या चौघांपैकी एकाही मुलाने हेल्मेट घातलेले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गर्दीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे वाहन चालवणे केवळ त्यांच्या जीवासाठीच नाही, तर इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठीही मोठा धोका ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

KALYAN WEST VIRAL VIDEO OF FOUR MINORS RIDING SCOOTER WITHOUT HELMETS SPARKS OUTRAGE
School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खडकपाडा (Kalyan Khadakpada) आणि आसपासच्या भागात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अनेकदा ही मुलं वेगमर्यादा न पाळता बेजबाबदारपणे गाड्या चालवताना आढळतात. मात्र, याकडे पालक आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या घटनेनंतर “अपघात झाल्यास जबाबदार कोण?” असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.

KALYAN WEST VIRAL VIDEO OF FOUR MINORS RIDING SCOOTER WITHOUT HELMETS SPARKS OUTRAGE
Monsoon Update : मान्सून २ दिवसांत धडकणार! महाराष्ट्राला पुढील ५ दिवस पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेतल्यास वाहन मालक आणि पालकांवर दंडात्मक कारवाईची स्पष्ट तरतूद आहे. दरम्यान, कल्याण वाहतूक पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत संबंधित वाहन आणि चालकाचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरटीओ आणि पोलिस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com