पनवेल हादरलं! अंगणवाडीत जाण्यास नकार दिला म्हणून चिमुरडीला आईने लाथ मारली; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Panvel Viral News Today : पनवेलमध्ये अंगणवाडीत जाण्यास नकार दिल्याने चार वर्षांच्या चिमुरडीला आईने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Panvel mother beats four year old daughter
Panvel mother beats four year old daughter Saam TV
Published On

Panvel mother beats four year old daughter viral video : पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अंगणवाडीत जाण्यास नकार दिल्याने एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी अंगणवाडीत जाण्यास तयार नसल्याने तिच्या आईचा संताप अनावर झाला होता. संतापाच्या भरात या आईने चिमुरडीला लाथाबुक्क्यांनी आणि अमानुषपणे मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बालहक्क आणि बालसुरक्षेबाबत आता तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, चिमुरडीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. तसेच, संबंधित महिलेची (आईची) देखील चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

लहान मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी समुपदेशन आणि प्रेमाची गरज असताना, अशा प्रकारे पोटच्या मुलांवर होणारे अमानुष हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Panvel mother beats four year old daughter
Mumbai local : मुंबई लोकल हत्याकांडातील धक्कादायक सत्य समोर; दारूच्या नशेत आरोपीने केला पोटात वार

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बालहक्क कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संबंधित आईवर 'बाल न्याय कायद्यांतर्गत' (Juvenile Justice Act) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. "अंगणवाडी किंवा शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या लहान मुलांना मारहाण करण्याऐवजी पालकांनी त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, अशा प्रकारची अमानुष मारहाण मुलांच्या मनावर गंभीर आणि कायमस्वरूपी आघात करू शकते," असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Panvel mother beats four year old daughter
मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल! बड्या मंत्र्यांना डच्चू; ठाकरेसेना फोडणाऱ्या शिंदेंसेनेला बक्षीस, श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com