Political News : आमदार आपात्रतेच्या उद्याच्या महत्त्वपूर्ण सुनावणीआधी विधानसभाध्यक्षांचा दिल्ली दौरा; नवीन वेळापत्रकाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

Rahul Narvekar on MLA Disqualification News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.
Rahul Narvekar
Rahul Narvekar Saam Tv
Published On: 

Mumbai News :

राज्यातील शिवसेना आमदार अपात्रतेबाबतची महत्त्वाची सुनावणी उद्या होणार आहे. या सुनावणीच्या एक दिवस आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत नवीन वेळापत्रक उद्या सादर करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुनावणीच्या नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.  (Latest News)

Rahul Narvekar
Maratha Reservation : मराठा बांधवांकडून मंत्री अतुल सावे यांना घेराव, नागरिकांचा संताप पाहून दुचाकीवरून ठोकावी लागली धुम

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करत त्यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर न केल्यास आम्ही दिलेले वेळापत्रक स्वीकारावे लागेल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Narvekar
CM Shinde On Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणादरम्यान मराठा आरक्षणावर CM शिंदेंचं मोठं वक्तव्य

दिल्ली दौऱ्याआधी विधानसभाध्यक्षांनी काय म्हटलं?

आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहे. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

तर राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलेल्या नोटिसांबद्दल बोलताना नार्वेक यांनी म्हटलं की, राष्ट्रवादीच्या आठ आमदाराना नोटीस ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे, त्यानुसार नोटीसा दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.