Francis Debreto Death: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, साहित्य विश्वावर शोककळा

Father Francis Debreto Passed Away: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांचे गुरूवारी पहाटे ५ वाजता निधन झाले.
Francis Debreto Death: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, साहित्य विश्वावर शोककळा
Francis Debreto DeathSaam Tv News
Published On

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष , प्रसिध्द साहित्यिक आणि पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Francis Debreto) यांचे निधन झाले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरूवारी पहाटे ५ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वसई येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८0 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्व आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.

Francis Debreto Death: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, साहित्य विश्वावर शोककळा
Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल; पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर वसईतल्या जेलाडी येथील निवासस्थानीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ४ वाजेपासून विरारच्या नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे देखील त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. याच चर्चमध्ये संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Francis Debreto Death: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, साहित्य विश्वावर शोककळा
Vasai News : वसईत ५ हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; कारखान्यावर धाड टाकत कारवाई

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समाजात एकता, बंधुता, शांतता, सामाजिक सलोखा रहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. 'सुवार्ता' साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण, नागरी, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी काम केले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे १९८३ ते २००७ या काळात सुवार्ताचे मुख्य संपादक होते.

Francis Debreto Death: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, साहित्य विश्वावर शोककळा
Virar Crime: कामावर जात असलेल्या बायकोला रस्त्यातच घेरलं; नवऱ्याने केला चाकूहल्ला, विरार रेल्वे पुलावरील धक्कादायक घटना

फ्रान्सिस दिब्रिटो यांनी वसईतल्या नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए आणि धर्मशास्त्रात एम.ए ची पदवी घेतली होती. १९७२ मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मगुरू होते. ख्रिश्चन धर्मासाठी त्यांनी खूप काम केले. यासोबतच त्यांनी समाजकार्य देखील केले. पर्यावरणाचे रक्षणकर्ते अशी देखील त्यांची ओळख होती. त्यांनी पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाशी संबंधित कामासाठी मोलाचे योगदान दिले.

Francis Debreto Death: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, साहित्य विश्वावर शोककळा
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर अतिमुसळधार पाऊस, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; ताजी आकडेवारी समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com