प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

Central Railway to Take Control of 10 Harbour Route Stations: वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील १० स्टेशन सिडकोकडून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होण्याची शक्यता. १० स्थानकांचा लवकरच कायापालट होणार.
Navi Mumbai Local
Mumbai Local NewsSaam Tv
Published On
Summary
  • वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील १० स्टेशन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होण्याची शक्यता.

  • सिडकोकडून २५ वर्षांपूर्वी बांधकाम झालं होतं.

  • हस्तांतरणानंतर प्रवाशांसाठी असणारी सुविधा सुधारेल.

हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी. आता सेंट्रल रेल्वेच्या हार्बर मार्गावरील दहा स्टेशनचे नियंत्रण लवकरच रेल्वे प्रशासनाकडे जाण्याची शक्यता आहे. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. सिडकोने या रेल्वेचे बांधकाम २५ वर्षांपूर्वी केले होते. परंतु, या स्टेशनचे देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी कुणाची असावी, यावर दोन्ही संस्थांमध्ये मतभेद आहेत. याच कारणास्तव हा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

वाशी - पनवेल हार्बर मार्गावर दररोज सुमारे १२ ते १४ लाख प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील महत्वाचे स्टेशन म्हणजे बेलापूर, खारघर, जुईनगर, सानपाडा. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील घनसोली, एरोली, रबाळे ही स्टेशन आहेत. सिडकोनं रेल्वेकडे या स्टेशनची जबाबदारी सध्याच्या स्थितीत घेण्याची विनंती केली आहे. मात्र, या इमारती २० ते २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे या इमारतींची आवश्यक दुरूस्ती करून त्यांना नवीन रूप देऊन हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Navi Mumbai Local
राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

मध्य रेल्वे सध्या वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवुड, बेलापूर, खारघर, मानसरोवर आणि पनवेल या स्टेशनचे नियंत्रण घेण्याचे विचार करीत आहेत. वाशी, पनवेल, ठाणे, तुर्भे, सानपाडा मार्गावरील प्रवाशांकडून सामान्य तिकीटासोबत अतिरिक्त अधिभार घेतला जातो. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिडकोला दर महिन्याला सुमारे ५ कोटी रूपयांचा अधिभार मिळतो. एप्रिलपासून ते आतापर्यंत २५ कोटींहून अधिक रक्कम सिडकोकडे जमा झालेली आहे. तरीही सिडकोकडून स्टेशन्सच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार प्रवाशांची आहे.

Navi Mumbai Local
'कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत सामूहिक बलात्काराचा प्रयत्न', कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर

सध्या काही स्थानकांची स्थिती दयनीय आहे. प्लॅटफॉर्मवरील टाइल्स फुटल्या आहेत. भूमिगत मार्ग खराब झाले आहेत. तसेच प्रकाश आणि विजेची सोय अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांनी आशा व्यक्ती केली की, रेल्वेकडून नियंत्रण मिळाल्यानंतर स्टेशनच्या सुविधांमध्ये सुधारणा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com