Shocking: शाळेत पोहचायला उशिर झाला, शिक्षिकेने उठाबशा काढायला लावल्या; विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
Vasai Shocking News Saam Tv

Shocking: शाळेत पोहचायला उशिर झाला, शिक्षिकेने उठाबशा काढायला लावल्या; विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

School Punishment: वसईमध्ये एका शाळकरी मुलीला शिक्षिकेने दिलेल्या शिक्षिकेमुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. शाळेत पोहचायला उशिर झाल्यामुळे या विद्यार्थिनीला शिक्षिकेने उठाबशा काढायला सांगितल्या. त्यानंतर या मुलीची प्रकृता खालवली आणि तिचा मृत्यू झाला.
Published on

Summary:

  • वसईमध्ये शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला

  • शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला

  • शाळेत पोहचायला उशिर झाल्यामुळे शिक्षिकेने दिली होती शिक्षा

  • उठाबशा काढताना मुलीची प्रकृती खालवली

मनोज तांबे, वसई

शाळेत शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत पोहचायला उशिर झाला त्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनीला उठाबशा काढायला सांगितल्या. उठाबशा काढल्यानंतर या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वसईमध्येही भयंकर घटना घडली असून या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली

मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेमध्ये ही घटना घडली. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काजल गौंडया विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. काजल गौंडला शाळेत पोहचण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे महिला शिक्षिकेने तिला उठाबशा काढायला सांगितल्या होत्या. त्याचवेळी काजलच्या पाठीमागे वेदना होत लागल्या आणि तिची प्रकृती खालवली.

Shocking: शाळेत पोहचायला उशिर झाला, शिक्षिकेने उठाबशा काढायला लावल्या; विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
Shocking News : मुंबई हादरली! तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, जबरदस्ती लिंग परिवर्तन, तृतीयपंथींच्या टोळीचं भयंकर कृत्य

काजलला उपचारासाठी तात्काळ नालासोपाराच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण परिस्थिती चिंताजनक झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान काजलचा मृत्यू झाला. काजलच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या शिक्षिकेविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी काजलच्या पालकांनी केली आहे. शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे ही घटना घडली त्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

Shocking: शाळेत पोहचायला उशिर झाला, शिक्षिकेने उठाबशा काढायला लावल्या; विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
Shocking: 'त्या दाढीवाल्या आजोबानं माझ्या...'. ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शेजारी राहणाऱ्याचं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com