Vasai Fort Photo Shoot : शिवरायांच्या पोषाखात फोटोशूट करताना रोखलं, वसई किल्ल्यावरील परप्रांतीय सुरक्षारक्षकाला मराठी तरुणाने शिकवला धडा; VIDEO चर्चेत

Vasai Fort Mumbai News : वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोशूटसाठी गेलेल्या तरुण आणि अमराठी सुरक्षारक्षकामध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर भाषावादाला नव्याने ठिणगी पडली आहे.
Vasai Fort Photo Shoot : शिवरायांच्या पोषाखात फोटोशूट करताना रोखलं, वसई किल्ल्यावरील परप्रांतीय सुरक्षारक्षकाला मराठी तरुणाने शिकवला धडा; VIDEO चर्चेत
Vasai Fort Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary

वसई किल्ल्यावर छत्रपतींच्या वेशात फोटोशूट करणाऱ्या तरुणाला अमराठी सुरक्षारक्षकाने थांबवलं

“मला मराठी येत नाही” या उत्तरामुळे तरुण संतप्त झाला आणि वाद उफाळला

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

या घटनेनंतर भाषावादाला नव्याने ठिणगी पडली आहे

राज्यात भाषावाद सुरु असताना डोक्यात तिडीक जाणारं नवं प्रकरण समोर आलं आहे. वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोशूटसाठी गेलेल्या तरुणामध्ये आणि किल्ल्यावरील सुरक्षारक्षकामध्ये वाद झाला. अमराठी सुरक्षारक्षकाने मराठी तरुणाला फोटोशूट करण्यापासून रोखलं तसेच मला मराठी येत नाही अस उलट प्रतिउत्तर केलं आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण शिवाजी महाराजांसारखा पेहराव करून किल्ल्यावर फोटो शूटसाठी गेला होता. फोटोशूट करताना त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं आणि हा मुद्दा थेट भाषिक वादाच्या दिशेने गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये असे दिसून येत आहे की, महाराजांच्या वेशात असलेला तरुण हा सुरक्षा रक्षकाला मराठी का येत नाही असं विचारत आहे. मात्र त्याला प्रतिउत्तर म्हणून सुरक्षारक्षकाने मला मराठी येत नाही असं म्हटलं.

यावर तरुणाने म्हटलं की, कधी शिकणार मराठी? महाराष्ट्रात राहून तुला मराठी कशी येत नाही? हा वसई फोर्ट आहे. इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे. गड कसे तुटले? कपल इथे काय करतात हे लोकांना समजलं पाहिजे. इतर कपल जेव्हा इथे घाणेरडे चाळे करतात तेव्हा तुम्ही त्यांना रोखता का ? छत्रपती कळतो का तुम्हांला? फक्त आम्ही फोटो शूट केलं म्हणून तुम्ही आम्हाला रोखताय ?

Vasai Fort Photo Shoot : शिवरायांच्या पोषाखात फोटोशूट करताना रोखलं, वसई किल्ल्यावरील परप्रांतीय सुरक्षारक्षकाला मराठी तरुणाने शिकवला धडा; VIDEO चर्चेत
Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

यांनतर सुरक्षा रक्षकाने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला यावर तरुणाने म्हटले की, छत्रपतींना थांबवायचं नाही. फालतुगिरी करतो आहोत का आम्ही? असे कपडे घालून मुलं दारू पित आहेत का ? इज्जतीत छत्रपतींना मान द्यायचा. आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं. त्याशिवाय इकडे आमच्या इथे यायचं नाही. असं तो म्हणाला.

या घटनेनंतर भाषा वादात नव्याने ठिणगी पडली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नक्की चूक कोणाची तुम्हाला काय वाटत ? पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com