महेंद्र वानखेडे, वसई
वसई पश्चिममधून मोठी घटना समोर आली आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झाल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. (Latest Marthi News)
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसरातील नौपाडा येथील आशा सदन नावाची दुमली इमारत आहे. रविवारी दुपारी या इमारतीमधून एका घरातून गॅसचा वास येऊ लागला होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी घराचे दार तोडून उघडल्यानंतर तीन तरुणांचे मृतदेह आढळून आले. यापैकी हॉलमध्ये दोन मृतदेह तर एक मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वसईतील तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव मोहम्मद आझम असे त्याचं नाव आहे. मोहम्मद आझम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. घरातील गॅस सुरू होता. त्यामुळे गॅस गळतीमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली.
'घराचा पंचनामा केला आहे. प्रथमदर्शनी कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटत नाही. गॅस सुरू असल्याचे दिसून आले. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, असे ते म्हणाले.
'गॅस सुरू राहिला असावा. त्यामुळेच तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली. मृतांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला आहे. हे सर्व उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. मे महिन्यात ते या इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.