Vasai Accident News: भीषण अपघात! वसईत भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी

वालिव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून या अपघातानंतर चालक फरार झाला आहे.
Vasai Accident News
Vasai Accident NewsSaamtv
Published On: 

Vasai Accident News: मुंबई वसईमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे एका भरधाव इनोवा कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला असून इनोव्हाच्या धडकेत दोन दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Vasai Accident News
Virar Crime News: बाजारात भररस्त्यामध्ये व्यवसायिकावर अ‍ॅसिड हल्ला; हल्लेखोर फरार

याबाबत अधिक माहिती अशी की, वसई (Vasai) पूर्वेच्या फादरवाडी येथे एका भरधाव इनोवा कारच्या धडकेत दोन दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला. दुचाकीवरील दोन तरुण दुचाकीत पेट्रोल भरून तुंगारेश्वर मंदिराकडे जात होते.

यावेळी फादरवाडी नाक्याजवळ एका भर वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने या दोघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर इनोव्हाचा चालक फरार झाला आहे. (Accident News)

Vasai Accident News
New Vidhan Bhavan: नव्या संसद भवनाप्रमाणे राज्यात नवे विधीमंडळ तयार होणार; राहुल नार्वेकर CM शिंदेंकडे देणार प्रस्ताव..

कार चालक फरार...

अपघातातील जखमी तरुणांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वालिव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

गोंदियामध्ये भीषण अपघात...

गोंदिया शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या उडान पुलावर दोन दुचाकी वाहने समोरासमोर धडकल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन तरुण गंभीर जखमी झाले. सचिन बघेले असे मृत तरुणाचे नाव असून तो गोरेगाव तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी तिघांवर गोंदिया जिल्हा शासकीय रुग्णायात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com