New Vidhan Bhavan: नव्या संसद भवनाप्रमाणे राज्यात नवे विधीमंडळ तयार होणार; राहुल नार्वेकर CM शिंदेंकडे देणार प्रस्ताव..

Maharashtra Politics: राज्यातल्या बदलत्या राजकारणाचा विचार करुन तसेच भविष्यातील आमदारांची संख्या विचारात घेवून हे विधीमंडळ भवन तयार करण्यात येणार आहे.
Vidhan Parishad Election 2022
Vidhan Parishad Election 2022 Saam Tv
Published On

सुरज मासुरकर, प्रतिनिधी....

Maharashtra Politics: काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्काराने हा उद्घाटन सोहळा चांगलाच वादात सापडला होता. ९७० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या संसद भवनानंतर आता महाराष्ट्रात नवीन विधीमंंडळ तयार होणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.

Vidhan Parishad Election 2022
Praniti Shinde News : ते आपल्या रक्तावर राजकारण करुन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतील, सावध रहा ! प्रणिती शिंदेंचा माेदींवर घणाघात

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नव्या संसद भवनाप्रमाणे (New Parliment Building) राज्यात नवे विधीमंडळ तयार करण्यात येणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्याच्या विधीमंडळ पार्किंग जागेतच हे नवे विधीमंडळ बांधण्याचा विचार सध्या सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) लवकरच प्रस्ताव देणार आहेत.

राज्यातल्या बदलत्या राजकारणाचा विचार करुन तसेच भविष्यातील आमदारांची संख्या विचारात घेवून हे विधीमंडळ भवन तयार करण्यात येणार आहे. या नव्या विधीमंडळात आमदारांच्या आसन व्यवस्था वाढवण्यात येणार आहेत. (Maharashtra Political News)

Vidhan Parishad Election 2022
Hingoli Crime News : भेटायला ये नाहीतर तुझ्या वडिलांना संपवतो, एकतर्फी प्रेमातून तरूणानं दिलेल्या धमकीनंतर अल्पवयीन मुलीने...

पावसाळी अधिवेशनाला सुरूवात...

राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. राजकारणात झालेल्या मोठ्या उलथ्यापालथीनंतर राजकीय समीकरणे पुर्णपणे बदलून गेली आहेत. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com