Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार? भाजपच्या 'त्या' तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

BJP complaint against Varsha Gaikwad : उज्ज्वल निकम यांच्याविरोधात वर्षा गायकवाड यांनी खोटा प्रचार केला, असा आरोप भाजपने केला आहे.
वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार? भाजपच्या 'त्या' तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
BJP complaint against Varsha GaikwadSaam TV

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात वर्षा गायकवाड यांनी खोटा प्रचार केला, असा आरोप भाजपने केला आहे.

वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार? भाजपच्या 'त्या' तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
Maharashtra Politics: 'मोदी सत्तेत येतील याचा २ दिवस आनंद घ्या' निवडणुकांच्या एक्झिट पोलवरुन काँग्रेसचा भाजपला टोला!

भाजपने पदाधिकारी शरद कांबळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोग आणि पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तक्रारदार शरद कांबळे यांना निर्मल नगर पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. वर्षा गायकवाड या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत.

त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला आहे. आता निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. अशातच वर्षा गायकवाड यांनी निवडणूक प्रचारात उज्वल निकम दलित विरुद्ध असल्याचा प्रचार केल्याचा आरोप भाजप पदाधिकारी शरद कांबळे यांनी केला आहे.

यासंदर्भात कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोग आणि पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तक्रारदार शरद कांबळे यांना निर्मल नगर पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे याप्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एक्झिट पोलमध्ये वर्षा गायकवाड आघाडीवर

महाविकास आघाडीतील जागा वाटपात, मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता. यामध्ये काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात भाजपने पूनम महाजन यांचं तिकीट डावलून उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, या मतदारसंघातून वर्षा गायकवाड निवडून येण्याची शक्यता आहे.

वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार? भाजपच्या 'त्या' तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
Loksabha Election Exit Poll: माझा विश्वास नाहीये, बरेच चुकीचे अंदाज; एक्झिट पोलवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com