Loksabha Election Exit Poll: माझा विश्वास नाहीये, बरेच चुकीचे अंदाज; एक्झिट पोलवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bachchu kadu On Election Exit Poll: लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोल आल्यानंतर भाजपचं सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र राज्यातील महायुतीमधील घटक पक्ष असललेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी हे चुकीचे अंदाज असल्याचं म्हटलंय.
Loksabha Election Exit Poll: माझा विश्वास नाहीये, बरेच चुकीचे अंदाज; एक्झिट पोलवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
Bachchu kadu On Election Exit Pol

अमोल घटारे, साम प्रतिनिधी

अमरावती: आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या लढाईत महायुतीची सरशी होताना दिसत आहे. मात्र बच्चू कडूंनी एक्झिट पोलचे हे अंदाज फोल ठरत कोणीही विजयाचे तोरण बांधू नये, असं म्हटलंय.

लोकसभा मतदानाच्या अखेरच्या टप्प्यानंतर निवडणुकांच्या निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी अंदाज वर्तवलेत. आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महाविकास आघाडीची सरशी होताना दिसत आहे. तर महायुतीचं टेन्शन वाढलंय, याच दरम्यान प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलीय. एक्झिट पोलवर मला विश्वास नाही, ते नमुने थोडे घेतले जाते, तर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाही. एक्झिट पोल वरून अंदाज काढणं चुकीचं असल्याच बच्चू कडू म्हणालेत. मात्र अमरावतीत प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुब जिंकणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. दरम्यान अमरावती मध्ये राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात लढत पाहायला मिळाली. लोकसभा तिकीटापासून ते मतदान होईपर्यंत या दोन्ही संघटनांमध्ये शाब्दिक चकमक घडत होती.

टीव्ही ९ पोलस्ट्रॅटनुसार, कोल्हापुरात शाहू महाराज आघाडीवर आहेत. त्यामुळे कोल्हापुरात संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. महायुतीने राज्यात ४५ पारचा नारा दिला होता, मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजामुळे त्यांना नारा हुकण्याची शक्यता आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com