Sanjay Raut: 'वर्षा गायकवाड की नसीम खान', काँग्रेसने ठरवावं; संजय राऊत असं का म्हणाले?

Maharashtra Election Lok Sabha 2024: आज नाशिकमध्ये महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करत आहे. कॉंग्रेसने ठरवावं की, कुणाला उमेदवारी द्यायची आहे, त्यांना अजूनही उमेदवार बदलायचा असेल तर बदलू शकतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
Sanjay Raut News
Sanjay RautSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे साम टिव्ही, नाशिक

आज नाशिकमध्ये महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करत आहे. कॉंग्रेसने ठरवावं की, कुणाला उमेदवारी द्यायची आहे. त्यांना अजूनही उमेदवार बदलायचा असेल तर बदलू शकतात, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला शक्ती प्रदर्शन करावं लागत नाही. लोकं स्वतःहून येतात. राजाभाऊ वाजे आणि भगरे यांचे अर्ज आज दाखल होतील. जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात येत (Sanjay Raut On Congress Candidate) आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यांनी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, महायुतीला आमच्या विरोधात उमेदवार मिळत नाही. त्यांनी 20 मे पर्यंत तरी उमेदवारी जाहीर करावी. मुंबईतल्या सर्व जागा आता जाहीर झाल्या आहेत. उत्तर मध्य मुंबई जागा (Mumbai North Central Lok Sabha constituency) काँग्रेस लढणार असं म्हणत आहेत. ती एक जागा बाकी आहे. खरगे म्हणाले, तिथे नसीम खान यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती.

मात्र , मुस्लिम असल्यानं ती जागा कठीण जाईल असं आम्हाला वाटत होतं, आमचा विरोध होता असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आमचा विरोध नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. वर्षा गायकवाड की नसीम खान यापैकी कुणाला (Maharashtra Election) उमेदवारी द्यायची, ते काँग्रेसने ठरवावं. अजूनही उमेदवार बदलता येऊ शकतो. त्यांचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार नाही. त्यांना अजूनही उमेदवार बदलायचं असेल तर बदलू शकतात. आमचा नसीम खान यांना विरोध नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं (Lok Sabha 2024) आहे.

Sanjay Raut News
Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे (Maharashtra Politics) करायचे. मुंबईला कंगाल करायचं आहे. त्यामुळे त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अडचण होत होती. त्यामुळे त्यांनी सरकार पाडलं.

मोदी आणि शहांना भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राऊतांनी दिला आहे. मोदी दहा वर्षात सतत खोटं बोलतात. खोटं बोलण्याचा त्यांचा जागतिक विक्रम लवकरच गिनीज बुकात जाईल. खोटं बोलण्याचा विक्रम ऑलम्पिकमध्ये जाईल का, हे पाहायला हवं अशी टीका संजय राऊतांनी मोदीवर केली आहे.

Sanjay Raut News
Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com