Vaishnavi Hagawane: क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं

Shashank Hagawane: वैष्णवी हगवणेचा नवरा आणि दीर यांना शस्त्रपरवाना दिल्याप्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत आले आहेत. तर यासंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Vaishnavi Hagawane: क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं
Vaishnavi Hagawane Death Case Saam tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांनी खोटा पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळवला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हे तर दाखल करण्यात आले आहेत. या दोघांना शस्त्रपरवाना मिळवून देण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आता जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे.' असे त्यांनी सांगितले. तर खोटे पत्ते दाखवून हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत आले आहेत.

हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्टिकरण जालिंदर सुपेकर यांनी दिले आहे. व्हॉट्सॲपवरून स्पष्टीकरण देत त्यांनी याबाबतची माहिती दिली. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात असे सुपेकर यांनी सांगितले. गैरसमजातून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचं सुपेकर यांचे म्हणणे आहे. विनाकारण बदनामी थांबवावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. पेकर हे सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत.

Vaishnavi Hagawane: क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं
Vaishnavi Hagawane Case : पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, वैष्णवीचे वडील म्हणाले नाईलाजानं मला मुलीचं लग्न करावं लागलं, आणि...

जालिंदर सुपेकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात. तत्पुर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलिस उपयुक्तांना देतात. त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलिस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो. त्यानंतर त्याचे आदेश हे अप्पर पोलिस आयुक्त प्रशासन हे काढत असतात. त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याच्या अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो. त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे.'

Vaishnavi Hagawane: क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं
Vaishnavi Hagawane: जावयाला दिलेल्या मोबाइलचे हप्ते फेडतोय; वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेंच्या दाव्याची केली पोलखोल

तर दुसरीकडे, खोटे पत्ते दाखवून हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत आले आहेत. हगवणे यांच्या शस्त्र परवाना अर्जावर सही अमिताभ गुप्ता यांनी पडताळणी न करता दिली. अमिताभ गुप्ता २०२२ मध्ये पुणे शहराचे पोलिस आयुक्त होते. नियमाप्रमाणे शस्त्र परवाना देताना अंतिम सही पोलिस आयुक्त यांचीच असते. मूळ पत्ता हा पुणे जिल्ह्यातला असून खोटा रहिवासी पुरावा देत पुणे शहर पोलिस आयुक्तालयात शस्त्र परवानासाठी हगवणे यांनी अर्ज केला होता. स्थानिक पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त, अप्पर पोलिस आयुक्त प्रशासन यांच्या पडताळणीनंतर पोलिस आयुक्त शस्त्र परवाना अर्जावर सही करतात. त्यामुळे हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी अमिताभ गुप्ता यांचे पण नाव पुढे येत आहे.

Vaishnavi Hagawane: क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं
Vaishnavi Hagawane: हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात मारणाऱ्यांचा सत्कार करणार, रोहिणी खडसे संतापल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com