Vaishnavi Hagawane: हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात मारणाऱ्यांचा सत्कार करणार, रोहिणी खडसे संतापल्या

Rohini Khadse On Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेवर हगवणेंच्या वकिलांनी वाटेल ते आरोप केले आहेत. त्यानंतर आता वकिलाला कानशिलात मारणाऱ्यांचा मी सत्कार करेन, असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.
Vaishnavi Hagawane
Vaishnavi HagawaneSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

वैष्णवी हगवणेप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यात आता हगवणे कुटुंबाने वैष्णवीवर आरोप लावत कळस केला आहे. तिच्यावर आरोप केले आहेत. या आरोपानंतर हगवणेंच्या वकिलाला चार कानशिलात मारणाऱ्यांचा मी सत्कार करेन,असं म्हणत रोहिणी खडसे यांनी हगवणेच्या वकीलावर संताप व्यक्त केलाय. त्याचं नेमकं कारण काय आहे? रोहिणी खडसेंनी ही ऑफर का दिली?

Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे वकील विपुल दुशींग यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल, सरकारी वकिलाची कॉलर पकडली अन्...; प्रकरण काय?|VIDEO

रोहिणी खडसेंची ऑफर

हगवणे कुटुंबाचा वकील विपुल दुशी आहे. यानं चक्कं कोर्टातच अकलेचे तारे तोडलेत... नवऱ्यानं बायकोच्या चार कानशिलात मारल्या तर ती हिंसा नाही, असा युक्तीवाद केलाय आणि त्याला संदर्भ दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा..... मात्र वकीलाच्या याच वक्तव्यामुळे संतापलेल्या रोहिणी खडसेंनी जो वकिलाच्या कानशिलात मारीन त्याचा मी सत्कार करीन, अशी ऑफरच दिलीय... तर दमानियांनीही हगवणेच्या वकिलाची सनदच रद्द करण्याची मागणी केलीय...

हुंड्यासाठी झालेल्या छळातून वैष्णवी मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला... या प्रकरणी वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, नणंद करिष्मा हगवणे, सासू लता हगवणे आणि दीर सुशील हगवणे तुरुंगात आहेत... मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींची बाजू मांडताना हगवणेच्या वकिलाने हद्दच पार केली..मात्र पुणे बार असोसिएशननेही संवेदनशीलपणे भूमिका घेण्याऐवजी अकलेचे तारे तोडणाऱ्या वकिलाचीच बाजू घेतलीय.... त्यामुळे रोहिणी खडसेंनी एक पाऊल मागे घ्यावं लागलंय...

Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagawane : ...अन् तेव्हा त्यांची थेट सरकारी वकिलांना मारहाण; हगवणेंचे वकील दुशिंग यांची कुंडली समोर

महिलांच्या छळासंदर्भात वकिलानं अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं.मात्र न्यायालयाने वकिलाचा युक्तीवाद फेटाळून लावत आरोपींना तुरुंगात धाडलं.त्यामुळे कोर्टातच हिंसेचं समर्थन करणाऱ्या वकिलांचे कोर्टानेच कान टोचायला हवेत.ज्यामुळे कुठलाही वकिल हिंसेचं समर्थन करणार नाही.

Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagawane: हगवणेंच्या 'या' 5 आलिशान गाड्या जप्त|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com