
गॅसने भरलेले सिलेंडर रेल्वेच्या रुळावर ठेवून घातपात घडविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उरूळी कांचनच्या हद्दीत रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास लोको पायलटच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी हा कट उधळून लावला असून उरूळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
रेल्वे आणि रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्याच्या सूचना केल्या. रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके,(वय ३८ ) यांनी याबाबत फिर्याद दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोको पायलट शरद वाळके हे रविवारी रात्री आपल्या हद्दीतील रेल्वे मार्गाची पाहणी करत होते.त्यांना रात्री पावणे अकराच्या सुमारास उरूळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर (रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५) प्रिया गोल्ड कंपनी गॅसचा सिलेंडर आढळला.
त्यांनी ते सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न केला, सिलेंडरमध्ये गॅस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या सिलेंडरमध्ये ३९००किग्रॅम वजनाचा गॅस होता. त्यानंतर त्यांनी ते सिलेंडर रेल्वे रुळापासून दूर नेत अज्ञात व्यक्तीचा घातपात घडविण्याचा कट उधळून लावला. शरद वाळके यांनी या प्रकारणाची माहिती पोलिसांना आणि वरिष्ठांना दिली. त्यानुसार उरूळी कांचन पोलिसांना रेल्वेच्या कलम १५०,१५२ नुसार अज्ञात व्यक्तीवर घातपाताचा घडवण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलाय.
याप्रकरणाचा तपास रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी,दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस,उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास उरूळी कांचन पोलिस करताहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.