Panvel to Borivali: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! पनवेल ते बोरीवली प्रवास होणार जलद, अगदी २० रूपयांत

New Harbour Line Train Panvel to Borivali: येत्या काही वर्षांमध्ये पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकल धावणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेनं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, गोरेगाव बोरीवली हार्बर लाइन प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार आहे.
Panvel to Borivali
Panvel to BorivaliSaam digital
Published On

मुंबई आणि मुंबई उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. येत्या काही वर्षामध्ये पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकल धावणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेनं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, गोरेगाव बोरीवली हार्बर लाइन प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार आहे. तसेच मालाड स्थानकात एक एलिव्हेटेड स्थानकाचे काम देखील प्रगतीपथावर आहे.

सध्या कांदिवली आणि बोरीवलीच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरूय. या प्रकल्पांतर्गंत हार्बर लाइनचा विस्तार म्हणून आणखीन दोन मार्गिका जोडल्या जाण्याची माहिती आहे. या विशेष प्रकल्पासाठी ८२५ कोटींचा खर्च करण्यात येणार असून, पश्चिम रेल्वेकडून MUTP-3A अंतर्गत हे काम केले जाणार असल्याची माहिती आहे.

Panvel to Borivali
Panvel Court : न्यायाधीशाच्या बोगस सह्या करुन बनवले वारस दाखले; लिपिकासह दोन वकिलांना अटक

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या टप्प्याअंतर्गत गोरेगाव ते मालाडपर्यंत २ किमीचे काम केले जाणार आहे. मुख्य म्हणजे हा पहिला टप्पा २०२६ ते २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मालाड ते बोरीवलीपर्यंत, ५ किमी पर्यंतचा विस्तार करण्यात येणार आहे. तसंच हा दुसरा टप्पा २०२७ ते २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण झाल्यानंतर बोरीवली ते पनवेल लोकल प्रवास प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

Panvel to Borivali
Mumbai Local Train: नशेखोर तरुणाचा आगाऊपणा! हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या विद्युत तारांवर चढला, अन्..

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७२ किमीचा प्रवास, ट्रेन न बदलता २० रूपयात होणार असून, ही लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईहून पनवेलपर्यंतचा प्रवास वेगवान -जलद होणार आहे. सीएसएमटी रेल्वे स्थाकावरून थेट पनवेलपर्यंत लोकलने येता येणार असल्यानं, या प्रकल्पाचा मोठा फायदा मुंबईकरांना होणारेय. गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरीवली असा एकूण ८ किमीचा हा मार्ग राहील. यामुळे हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com