Fraud Case : बोगस टीसी असलेल्या महिलेकडून फसवणूक; रेल्वेत नोकरीचे आमिष देत १७ लाखात गंडविले

Pune News : सुरेश नाईक यांना २०२२ मध्ये एक फोन आला. ज्यामध्ये संजीवनी पाटणे यांनी त्यांच्या घरातील काम आहे असं सांगितलं त्यानुसार नाईक त्यांच्या घरी काम करायला गेले हा सगळा प्रकार २०२२ मध्ये घडला
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

अक्षय बडवे

पुणे : भारतीय रेल्वेमध्ये टीसी असल्याची बतावणी केली. तसेच पती बीएसएफमध्ये असल्याचे खोटे सांगत महिलेने एका भारतीय लष्कर दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास गंडविले आहे. यात भारतीय रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवत तब्बल १७ लाख रुपयांत फसवणूक केली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सुरेश नाईक हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले असून सध्या ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. हा सगळा प्रकार २०२२ मध्ये घडला. सुरेश नाईक यांना २०२२ मध्ये एक फोन आला. ज्यामध्ये संजीवनी पाटणे यांनी त्यांच्या घरातील काम आहे असं सांगितलं. त्यानुसार नाईक हे त्यांच्या घरी इलेक्ट्रिक काम करायला गेले. यावेळी पाटणे यांनी आपण भारतीय रेल्वे विभागात टी सी आहोत असे सांगितले. तसेच रेल्वे विभागाचा आय डी कार्ड आणि बिल्ला सुद्धा दाखवला. 

Fraud Case
Sambhajinagar CIDCO Police : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; संभाजीनगर सिडको पोलिसांची कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नोकरी लावून देण्यासाठी घेतले १७ लाख  

तसेच पत्नी भारतीय लष्कर दलाच्या बीएसएफ तुकडीमध्ये असल्याचे सांगितले. यामुळे तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावायची असेल तर सांगा पण पैसे भरावे लागतील असं सांगितलं. त्यानुसार सुरेश नाईक यांनी त्यांची भाची आणि पुतणीसाठी नोकरी लावून देण्याबाबत महिलेला सांगितलं. याकारीता पाटणेने त्यांच्याकडून वेळोवेळी विविध रक्कम काढून घेतली. पाटणे आणि तिच्या साथीदाराने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण १७ लाख रुपये उकळले. 

Fraud Case
Nashik Crime : रिक्षांची चोरी करून बनावट नंबर प्लेट लावत विक्री; पोलिसांनी सहा रिक्षांसह एकास घेतले ताब्यात

पोलिसांकडून दोघांचा शोध 

दरम्यान नाईक यांनी महिलेला १७ लाख रक्कम दिल्यानंतर वारंवार नोकरी कधी लागणार याबाबत विचारणा केली. मात्र पैसे घेऊन नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश नाईक यांनी पोलिसात धाव घेत याप्रकरणी सुरेश नाईक यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या संजीवनी पाटणे आणि शुभम मोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com