Pimpri Chinchwad: माणुसकीला काळीमा! अज्ञाताने नवजात बाळाला नाल्यात फेकलं; भटक्या कुत्र्यांनी लचकेच तोडले

Pimpri Chinchwad Crime: अज्ञात व्यक्तीने शहरातील बालाजीनगर परिसरात असलेल्या नाल्यात नवजात बाळाला फेकून दिलं. रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी या बाळाचे लचके तोडले.
Pimpri Chinchwad baby News
Pimpri Chinchwad baby NewsSaam TV

Pimpri Chinchwad baby News: पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शहरातील बालाजीनगर परिसरात असलेल्या नाल्यात नवजात बाळाला फेकून दिलं. रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी या बाळाचे लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad baby News
Beed Crime News: लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडशी फोनवर बोलायची; नवरा सांगून कंटाळला, शेवटी स्वतःलाच संपवलं

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतीत असणाऱ्या बालाजीनगर परिसरात एक नाला आहे.

या नाल्यात एका अज्ञात व्यक्तीने जिवंत असलेल्या नवजात बाळाला फेकून दिलं. अडगळीची जागा असल्याने कुणीही या बाळाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी बाळाचे लचके (Crime News) तोडले. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.

ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बाळाचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढत ताब्यात घेतला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नवजात बाळाला रस्त्यावर फेकून देण्याची पिंपरी चिंचवडमधील ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील जुलै महिन्यात मरकळगावमधील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं पुरुष जातीचं अर्भक आढळून आलं होतं. भर पावसात या बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्यावर सोडण्यात आलं होतं.

Edited by - Satish Daud

Pimpri Chinchwad baby News
High Court News: माहेरच्यांशी बोलण्यावरून बायकोवर बंधने घालणे ही मानसिक क्रूरता; मुंबई हायकोर्टाचं मत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com