महापारेषणची नवी दिल्लीत चर्चा; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांपासून महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून कौतुकाची थाप

mahapareshan news : महापारेषणची नवी दिल्लीत चर्चा होत आहे. महापारेषणला केंद्रीय ऊर्जामंत्र्यांपासून महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.
mahapareshan
mahapareshan Saam tv
Published On
Summary

नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर, नाईक, राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी भेट देऊन केले कौतुक

नवी दिल्लीत भारत इलेक्ट्रिसिटी परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) आकर्षक, पर्यावरणपूरक आधुनिक तंत्रज्ञान केंद्रित स्टॉलला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी स्टॉलला भेट देत महापारेषणच्या कार्याचे कौतुक केलंय.

नवी दिल्लीतील यशोभूमी, व्दारका येथे भरविण्यात आलेल्या या ४ दिवसीय परिषदेत महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल उभारला होता. महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली, संचालक (संचलन) सतीश चव्हाण आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल साकारण्यात आलाय.

mahapareshan
Shani Shingnapur : शनेश्वर देवस्थानच्या तिजोरीवर शेकडो कोटी रुपयांचा डल्ला?; ऋषिकेश शेटे यांच्यासह कार्यकर्त्यांचे उपोषण

या स्टॉलमध्ये महापारेषणची प्रगती, ध्येय-उद्दिष्टे, तसेच भविष्यातील २०३० पर्यंतचे नियोजन याबाबत डिजिटल माध्यमातून माहिती सादर करण्यात आलीये. ड्रोन आणि मोबाईल ऍप तंत्रज्ञानाव्दारे पारेषण वाहिनी पेट्रोलिंग, एमटीएएमसी सबस्टेशन ऑटोमेशन प्रणाली यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती अभ्यागतांना देण्यात आलीये. या स्टॉलला परिषदेत उल्लेखनीय भेटी मिळाल्या. त्याचबरोबर देश-विदेशातील प्रतिनिधींनी महापारेषणच्या तांत्रिक प्रगतीचे विशेष कौतुक केले.

mahapareshan
खरातसोबतच्या व्हायरल फोटोंवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण; भेटीमागचं कारण सांगितलं

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी., तेलंगणा साऊथ वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जितेश पाटील, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर यांनी स्टॉलला भेट देऊन समाधान व्यक्त केले. याचबरोबर आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही स्टॉलला भेट देत महापारेषणच्या नवतंत्रज्ञानाची प्रशंसा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com