एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; युवा नेत्याचं नगरसेवक पद रद्द, कारण आलं समोर

eknath shinde news : उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याचं नेत्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.
ulhasnagar politics
ulhasnagar news Saam tv
Published On

उल्हासनगरात शिंदे गटाला मोठा धक्का

नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे पद रद्द

नगरसेवक पद रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊन अनेक महिला उलटले आहेत. निवडणूक झाल्यानंतर प्रभागाची कामांना सुरुवात झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या नेत्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने शिंदे गटाच्या नेत्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय.

उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक ६ 'अ' मधून निवडून आलेले नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय.

नाशिक जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने विकी सिंग लबाना यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आहे. विकी सिंग लबाना यांनी 'बंजारा' जातीचे प्रमाणपत्र सादर करत नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. मात्र जात पडताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या. त्यानंतर त्यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. यानंतर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकृत आदेश काढले.

ulhasnagar politics
'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ulhasnagar politics
मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

मुंबईत ७९ नगरसेवकांच्या निवडीविरोधात कोर्टात याचिका

मुंबई महापालिकेतील ७९ नगरसेवकांच्या निवडीविरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी अनेक याचिका न्यायप्रविष्ट आहेत. काही प्रकरणावर सुनावणी देखील सुरू आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेच्या विधी खात्याकडून माहिती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com